कोयना पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली होती.
कऱ्हाड : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर दोन दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता 86.63 टीएमसी झाला. सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या ४० हजार क्युसेकमध्ये वाढ करून आज सकाळी नऊ वाजता ५० हजार क्युसेक करण्यात आला आहे.
पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात ५२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठी (Krishna-Koyna River) पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे कोयना धरणातून करण्यात येणारा ३० हजार क्युसेक विसर्ग चार दिवस स्थिर ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पुराचा धोका टळल्याने मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंगळवारी थोडा वाढला. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली.
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तो विसर्ग चार दिवस स्थिर ठेवण्यात आला होता. आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणात 86. 63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात 52 हजार 834 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असा ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला 96, नवजाला 131 व महाबळेश्वर येथे 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ५० हजार क्युसेक करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीपात्रात ५२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नद्याच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीकाठी पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.