पावसाचा रुद्रावतार; म्हारवंडला भूस्खलन, ग्रामस्थ भयभीत

Mahrwand
Mahrwand
Updated on

तारळे (जि. सातारा) : सह्याद्रीच्या कुशीत अति दुर्गम क्षेत्रात वसलेल्या म्हारवंडकरांना (mahrwand) अजूनही पावसाळ्यात (rainy days) गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. बुधवारी रात्री पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावात येणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन (landslide) होऊन कड्याच्या मातीचा ढिगारा कोसळला आहे. येथील मातीचा राडा रोडा व पाणी लोकांच्या घरात घुसले असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (satara-rain-update-breaking-news-landslide-mahrwand)

म्हारवंड हे पाटण व तारळे पासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात वसले आहे. येथे गेली काही वर्षे लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या गावावर भूस्खलनाची टांगती तलवार असल्याने पावसाळ्यात येथे रात्री जगविल्या जातात. गेल्यावर्षी दैनिक सकाळने येथील अडचणी प्रशासना समोर आणून रखडलेले निवारा शेडचे काम पूर्ण करण्यास भाग पाडले. मात्र येथील मूलभूत सुविधा अपुर्ण असतानाच महसूल विभागाने हे शेड जबरदस्तीने लोकांच्या ताब्यात दिले असल्याचे येथील लोकांचा आरोप आहे. निवारा शेड मध्ये वीज, पाणी, रस्ता, शौचालय आदी मूलभूत सुविधा नसल्याने लोक घरातच आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आसरा घेण्यासाठी बांधलेले शेड असूनही लोक बेसहरा झाले आहेत.

Mahrwand
महाबळेश्वर तापाेळा रस्त्यावर दरड काेसळली; एनएच 4 चे पाणी ओसरले

काल पासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र रात्री पावसाचा जोर वाढून पावसाने झोडपून काढले. यामुळे विविध ठिकाणी नुकसानीच्या घटना समोर येत आहेत. म्हारवंड मध्ये रात्रीच्या पावसाने भूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावाला येणारा मार्गही बंद झाला असून दळणवळण ठप्प झाले असून गाव संपर्कहीन होण्याचा धोका उभा राहिला आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने मदत कार्य राबविण्याची गरज आहे.

Mahrwand
उदयनराजेंचा सरकारला अल्टिमेटम; 'मराठा आरक्षणा'साठी केल्या 6 मागण्या

निवारा शेड बांधली मात्र पाणी, वीज रस्ता, शौचालय आदी मूलभूत सुविधा न पुरविताच लोकांच्या ताब्यात जबरदस्तीने दिली आहेत. त्यामुळे आधी मूलभूत सुविधा पुरवाव्यात गावात गंभीर स्थिती होण्याआधी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे

विकास निकम ग्रामस्थ म्हारवंड

दरम्यान सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पावासाची हजेरी लागेली नाही. गाेंदवले, मायणी या भागात काही काळ रिमझिम पाऊस झाला आहे.

Mahrwand
प्रेयसीला आधी शॉपिंगला नेले, नंतर केली हत्या; प्रियकर गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.