सावधान! पुणे बंगळूर महामार्गाची वाहतुक संथ गतीने; काेयनेत जाेर

rain
rain
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने जाेर धरला. परिणामी पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे चाफळ भागातील वीज पूरवठा खंडीत झालेला आहे. गोटे गावानजीक ओढ्याला पाणी आल्याने वाहतुक ठप्प झाली हाेती. आज (गुरुवार) सकाळपासून सातारा शहरासह पाचगणी, क-हाड, चाफऴ, खंडाळा आदी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. काेयना धरणात तीन टीेएमएसी पाणी साठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने 'ई-सकाळ'ला दिली. (satara-rain-update-koyna-dam-3-tmc-water-stored)

मुसळधार पावसाने बुधवारी रात्रीपासून कराड- पाटण तालुक्याला झोडपून काढले आहे. पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील गोटे गावानजीक मोठ्या प्रमाणात ओढ्याला आलेले पाणी महामार्गावर आले आहे. त्यामुळे वाहनांना महामार्गावरील पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. परिणामी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून बेसमेंट मधील दुकान गळ्यात पाणी गेले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे दोन आठवड्यानंतर पुन्हा नुकसान झाले आहे.

rain
'कृष्णा'त काँग्रेसची मते विभागणार; मंत्री कदमांनंतर उंडाळकरांची भूमिका जाहीर

दोन आठवड्यानंतर पुन्हा काल रात्रीपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. पाचवड फाट्यानजीक महामार्गावरील उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूच्या शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उर्वरित क्षेत्रावरील पेरणे रखडण्याची चिन्हे आहेत.

काशिळ, खंडाळा, पुसेगाव, चाफळ , पाचगणीत जाेरदार पाऊस पडत आहे. चाफळ परिसरात रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत पावसाने झोडपले. पाणीपुरवठ्याची पाईप लाईन वाहून गेली. रात्रभर वीजपुरवठा खंडीत. वाई परिसरातही रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या., अधून मधून जोर वाढत होता. वडुज, गाेंदवले, खटाव भागात पाऊस नसल्याने शेतीची कामे सुरु आहेत.

rain
rainsystem

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला पाऊसधारा कोसळत आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असुन आज सकाळी आठच्या माहितीनूसार 21 हजार 672 कूसेक्स पाण्याची आवक झाली. धरणात 31.67 टीएमसी पाणी साठा झालेला आहे. गत 24 तासांत तीन टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे दमदार आगमन झाले आहे. धरण व्यवस्थापानाने दिलेल्या माहितीनूसार पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 251 मिलीमीटर, महाबळेश्वर येथे 198 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रातील नवजा या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येथे 244 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे.

rain
वाह, क्या बात है! निंबोडीच्या 'आकाश'ची लेफ्टनंट पदाला गवसणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()