Satara : ‘रयत’चे लवकरच रेडिओ स्टेशन

९०.१ मेगाहर्ड्‌सवर शैक्षणिक कार्यक्रम
satara
satarasakal
Updated on

सातारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्तही ज्ञान मिळावे, त्यांना स्पर्धा परीक्षांचे अतिरिक्त शैक्षणिक मार्गदर्शन व्हावे, पालकांसह शिक्षकांनाही शिक्षणातील बदल तातडीने कळावेत, यासाठी तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी रयत शिक्षण संस्था आता ‘रयत कम्युनिटी रेडिओ स्टेशन’ सुरू करणार आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ९०.१ मेगाहर्ड्‌सवर लवकरच विद्यार्थ्यांना या रेडिओ स्टेशनचा लाभ घेता येणार आहे.

रयतचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. पारंपरिक शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था नव्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत आता दुर्गम भागातील मुलांनाही शिक्षण देत आहे. कोरोना काळात शाळा बंद असताना ऑनलाइन शिक्षणात संस्थेने राज्यात आघाडी घेतली होती. त्याचा पाया संस्थेने शिक्षणाची विविध ॲप, वेबसाईट करून आधीच केला होता. त्यामुळे शहरी, निमशहरी विद्यार्थ्यांबरोबरच दुर्गम भागातील विद्यार्थीही कोरोना काळातही ज्ञानदान करू शकले.

आता रयत ‘रयत कम्युनिटी रेडिओ स्टेशन’ सुरू करणार आहे. केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी त्याचा प्रस्ताव आहे. या रेडिओ स्टेशनची तयारी स्टुडिओसह संस्थेने केली आहे. प्रारंभीच्या काळात ९०.१ मेगाहर्ड्‌सवर या स्टेशनचे कार्यक्रम करता येणार आहेत. त्या माध्यमातून सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सर्व शैक्षणिक कार्यक्रम सुरू राहतील. त्यात शालेय स्कॉलरशिप परीक्षा ते एमपीएससीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन,

शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, व्याख्याने, मुलांसाठी संस्कारक्षम सांस्कृतिक कार्यक्रम, पालक आणि शिक्षकांसाठी शिक्षण क्षेत्रातील बदल याबाबतचे कार्यकम होतील. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स आणि जॉब उपलब्धतेची माहितीपर कार्यक्रमही असेल. हे सर्व थेट प्रक्षेपण (लाइव्ह) आणि ऑफलाइन कार्यक्रम ऐकता येणार आहेत. त्यासाठी रयत वेबसाईट, शैक्षणिक लिंक उपलब्ध आहे. शिवाय ॲड्रॉईस आयएसओ असे विविध ॲपही तयार केले जात आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थी एखाद्या विषयाचे मार्गदर्शन पुन्हा हवे तेव्हा घेऊ शकणार आहेत. संस्थेने अनेक शैक्षणिक विषयांचे ऑडिओ, व्‍हिडिओ कार्यक्रम तयार आहेत. त्याची विषयवार जुळणी केली जात आहे.

रयत शिक्षण संस्थेने शिक्षणात नवे तंत्रज्ञान आणण्यास प्राधान्य दिले आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी सक्षम व्हावेत, त्यांना मार्गदर्शन होत राहावे, तेही मोफत, यासाठीच ‘रयत कम्युनिटी रेडिओ स्टेशन’ सुरू करणार आहे.

- डॉ. अनिल पाटील,कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.