‘रयत’मुळे स्वावलंबी संस्कार : पोपटराव पवार

पोपटराव पवार यांनी आज रयत शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली.
पोपटराव पवार
पोपटराव पवारSakal
Updated on

सातारा : हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पुरस्कार विजेते आणि जलसाक्षरता अभियान प्रभावीपणे राबवणारे पोपटराव पवार यांनी आज रयत शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

या वेळी श्री. पवार म्हणाले,‘‘ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. त्याचा विस्तार नगर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे केल्यामुळे माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली. रयतच्या स्वावलंबी शिक्षण व श्रमदानाच्या संस्कारात मी घडलो. ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या भूमिकेतून मी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. जलसाक्षरता अभियान पुकारले. हे सर्व केवळ कर्मवीर अण्णांमुळे मिळालेल्या शिक्षणामुळे घडू शकले, याची जाणीव आहे.’’

पोपटराव पवार
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

नगर जिल्ह्यातील हिंगणगावसारख्या ग्रामीण भागात संस्थेने एक ज्ञान मंदिर उभे केले. त्यामुळे आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. त्या काळात कर्मवीर जयंतीचा उत्सव आम्ही एखाद्या सणाप्रमाणे साजरा करीत असू. तो विचार आणि संस्कार पुढच्या पिढीला आज देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

जलसाक्षरता हा आजचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून देणे हे शिक्षकांबरोबरच समाजाचेही कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते श्री. पवार यांचा रयत महावस्त्र, कर्मवीरअण्णा यांचे चरित्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्रिन्सिपल डॉ. प्रतिभा गायकवाड, संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, शहाजी डोंगरे, संस्थेचे समन्वयक डी. एस. सूर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.