सातारा : अतिवृष्टीतील नुकसानीची तीनच महिन्यांत दुरुस्ती

विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले.
Satara
SataraSakal
Updated on

चाफळ : जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीतील महापुराने चाफळ व तारळी धरणाच्या नदीपात्रातील बंधारे व लगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, कोयना जलसिंचनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांच्या अवधीत या सर्व कामांची दुरुस्ती पूर्ण केली. त्यामुळे चाफळ व तारळे परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले.

पाटण तालुक्यासह चाफळ व तारळे परिसरातही २३ जुलै रोजी ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे शेतीसह नदीकाठच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे, जमिनीचे नुकसान झाले होते. बंधाऱ्यांमध्ये वाहून आलेली मोठमोठी झाडेझुडपे अडकून शेजारील शेतीचे खचून नुकसान झाले होते. उभी पिके पाण्याने वाहून गेली होती. या सर्वाचे सविस्तर वृत्त दैनिक ‘सकाळ’ने दिल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता लागलीच पाहणी करून आजअखेरीस चाफळ येथील भवानवाडी, कळंत्रेवाडी, खालकरवाडी व माजगाव या उत्तरमांड नदीवरील बंधाऱ्यांची, तारळे विभागातील पाली, इंदोली, शिरगाव, वडगाव या बंधाऱ्यांचीदेखील पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हानी होऊन बंधाऱ्यासह शेजारील शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

Satara
अंबाजोगाई : शेळ्यांचा मृत्यू; शेतकरी चढला पाण्याच्या टाकीवर

या सर्व बाधित ठिकाणी कोयना जलसिंचन विभाग कोयनानगरचे मुख्य कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता सागर पाटील, उत्तरमांड व तारळी सिंचन उपविभाग नागठाणे येथील कनिष्ठ अभियंता पूजा दहिफळे, निसार मुल्ला, आर. एन. नाकाडी यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करून संबंधित ठिकाणी काम केले. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.