नागठाणे (जि. सातारा) : प्रयत्नाला, प्रतिभेला कोणत्याही सीमारेखा नसतात. त्याचीच प्रचिती देताना सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागातील युवकाने मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या लघुपटाची आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी निवड झाली आहे. युवकाच्या या आगळ्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संगम धनवडे हे या युवकाचे नाव. तो शेंद्रेलगत असलेल्या शिवाजीनगरचा रहिवासी. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या "महाकर्म' या लघुपटाची आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे देशातून केवळ दोनच लघुपट या महोत्सवासाठी निवडण्यात आले असल्याचे संगम सांगतो. सध्या तो मुंबईतील कांदिवलीत वास्तव्यास आहे. त्याचे सिनेमाचे वेड सततचे. त्यातून त्याने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून छोट्या भूमिका केल्या आहेत. टीव्ही मालिकांतूनही तो चमकला आहे. नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. अर्थात अशा छोट्या भूमिकांत मन रमत नव्हते, असे संगम सांगतो. काही तरी वेगळे करण्याच्या हेतूने तो लघुपटाकडे वळला. त्यातून मित्रांसह एकत्र येत त्याने या लघुपटाची निर्मिती केली आहे. अभिजित शेलारने दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
हर्षद काळे, सुनीलदादा, अजिंक्य टेकावडे, रोहित दिवेकर, अक्षय देशमुख, गणेश देशमुख, रवी निकम, प्रशांत झोरे यांचाही त्यात सहभाग आहे. 50 वर्षांपूर्वीच्या काळातील प्रथा, परंपरेवर आधारित हा लघुपट आहे. त्या वेळचा काळ, ते वातावरण, वेशभूषा यांचा मेळ घालणे हे आव्हान होते. मात्र, अथक परिश्रमाने, अविश्रांत मेहनतीने या मित्रांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले.
खडतर परिश्रम...
लघुपटासाठी खडतर आव्हानांना सामोरे जावे लागल्याचे संगम सांगतो. परीक्षेचा अभ्यास, पैशांची जुळवाजुळव, वाढता खर्च या समस्या होत्या. या सहा मित्रांनी 20 दिवसांत तब्बल अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून लघुपटाच्या चित्रीकरणासाठी जागा शोधल्या. त्या वेळचे वातावरण उभे करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.
संपादन ः संजय साळुंखे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.