शिवसैनिकांनी पालिकांसाठी कामाला लागावे : उदय सामंत

महाबळेश्वरमध्ये पदाधिकाऱ्यांचा शिवसंवाद मेळावा
Mumbai
Mumbaisakal
Updated on

महाबळेश्वर : जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिवसेना स्वबळावर लढविणार असून, शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसंवाद मेळावा येथे आयोजिण्यात आला होता. या वेळी श्री. सामंत बोलत होते. याप्रसंगी सातारा व सांगली संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानगुडे-पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर आदी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले,‘‘ येत्या निवडणुकांमध्ये आपणाला सांघिक कामगिरी करावी लागेल. गटतट बाजूला सारून भगवा फडकविण्यासाठी एकत्र यावे लागेल. लोकहिताची कामे तळागाळापर्यंत पोचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, आपण केलेल्या कामाची प्रसिद्धी करीत नाही.

Mumbai
मिरज : मारहाणीतील शेतकऱ्याचा मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा

त्यामुळे आपल्या कामांचे श्रेय दुसराच घेऊन जातो. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नाव व विचार तळागाळात पोचविणाऱ्या शिवसैनिकाला पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली जाईल. हार तुरे घेऊन मागे-पुढे करणाऱ्या तसेच स्ट्रॉबेरी घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार नाही.’’

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची पहिली शाखा महाबळेश्वर येथे स्थापन झाली होती, असे सांगून प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले,‘‘ स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचेही महाबळेश्वरवर नितांत प्रेम असल्याने त्यांनी महाबळेश्वर शहरासह तालुक्याच्या विकासासाठी ३०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा निधी दिला आहे. आता महाबळेश्वरबरोबरच संपूर्ण जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे.’’

या वेळी माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांची नुकतीच जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. युवासेनेचे तालुकाप्रमुख नितीन भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश कुंभारदरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.