सातारकरांनो.. ऑक्‍सिजनची कमतरता भासतेय, मग आम्हाला फोन करा

सातारकरांनो.. ऑक्‍सिजनची कमतरता भासतेय, मग आम्हाला फोन करा
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून अनेकांनी यात प्राण गमावला आहे. अनेकांना व्हेंटिलेटर, बेडअभावी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. या सगळ्याचा विचार करत, सामाजिक भान जपत सातारच्या वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला असून रुग्णांसाठी १५ पोर्टेबल ऑक्सिजन मशिन उपलब्ध केल्या आहेत. एकीकडे व्हेंटिलेटर, बेडअभावी उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असल्याची वस्तुस्थिती वारंवार समोर येत असली, तरी ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झालेल्यांना वाचविणाऱ्यांच्या स्वयंसेवी संस्था संख्या वाढलेली आहे. क-हाड पाठोपाठ आता सातारा शहरातही ज्या नागरिकांना आवश्यकता आहे त्यांच्या घरी जाऊन पोर्टेबल ऑक्‍सिजनची सुविधा देण्यात येत असल्याने नागरिकांना जीवदान मिळत आहे.

वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेचे शशिकांत पवार म्हणाले, साता-यात एकूण १५ मशिन्स उपलब्ध होतील. या मशिन्स सिलीगुडी येथून मागवण्यात आल्या आहेत. एका मशिनची किंमत साधारण २६ हजार इतकी आहे. तीन मशिन्सच्या माध्यमातून मोफत सेवा पुरवण्यात येत आहे. आगामी काळात आणखी १२ मशिन्स लवकरच उपलब्ध होतील. या मशिनचा वापर ऑक्सिजनचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. मात्र, एखाद्या पेशंटची ऑक्सिजन लेवल खूप कमी झाले असेल, तर मशिनचा काही उपयोग होऊ शकत नाही. पेशंटला ही मशिन बेड मिळेपर्यंत दिलासादायक ठरतात. 

असे चालते मशिन
जिल्ह्यात कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आणखी ५० मशिन खरेदी करण्याचा संस्थेचा मानस आहे. जशी मागणी वाढेल, त्या पध्दतीने आम्ही मशिनचा पुरवठा करणार आहोत. ही मशिन आम्ही पेशंटला घरी घेऊन जाण्यास सांगतो, घरी उपचार घेता येऊ शकतात, त्यामुळे याबाबत आम्ही त्या मशिनची माहितीही त्यांना देतो. तद्नंतर पेशंट बरा झाला की, दुस-या किंवा तिस-या दिवशी रुग्ण मशिन परत आणून देतात. हे मशिन पूर्णता लाईट वरती चालते. मात्र, या मशिनमध्ये दोनशे मिली पाणी भरावं लागतं, तसेच ही मशिन हवेतील ऑक्सिजन घेत कार्य करते, असेही त्यांनी सांगितले. सातारचा वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्था हा जुना ग्रुप आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजवर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या संस्थेने आजपर्यंत माणुसकीची भिंत, पोवई नाका येथे अन्नछत्र, रक्तदान शिबिरं, पाच रुपयात जेवन संकल्पना हे आदी उपक्रम राबविले जात आहेत. ८३ सदस्यांचा हा ग्रुप असून सात वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. 

शहरात ऑक्‍सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, साधे बेडही शिल्लक नाहीत. अशा विदारक स्थितीशी सामना करावा लागतो आहे. अशातच वात्सल्य संस्थेने पुढाकार घेत सातारा शहरात १५ पोर्टेबल ऑक्‍सिजनची मशिन उपलब्ध केल्या आहेत. ही मशिन संस्थेच्या माध्यमातून मोफत उपचारार्थ दिली जाणार आहे. ज्या कोणाला या मशिनची आवश्यकता त्यांनी शशिकांत पवार (९१५८००६३३३) व रणजित सावंत (९८६०५२१२३४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मशिनमुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे. ज्या नागरिकांची ऑक्‍सिजनचे प्रमाण अत्यंत कमी होत आहे, त्यांना त्या मशिन्सचा चांगला वापर होत आहे.

मृत्युदर आटोक्‍यात आणण्यासही नागरिकांच्या सामुदायिक प्रयत्नामुळे यश आले आहे. त्याशिवाय तितक्‍याच मशिन्स सेवाभावी संस्था, युवकांच्या पुढाकारानेही समाजातील विविध ठिकाणीही आल्या आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजन लेवल कमी होणाऱ्यांसाठी ती अत्यंत चांगली गोष्ट ठरली आहे. त्यामुळे अनेकांना जीवदानही मिळाले आहे, असे वात्सल्य संस्थेचे शशिकांत पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.