सातारा : आपल्या पत्नीच्या अकाली, अवेळी जाण्यामुळे निराशेने ग्रासलेल्या डॉक्टरांसाठी जन्मतः दोन्ही हात नसलेल्या युवकाची आणि त्याच्या पत्नीची जीवनकहाणी जगण्याचा कवडसा ठरली. ‘सकाळ’मधील एका बातमीने त्यांना जगण्याची उभारी दिली. मनातील आत्महत्येचे विचार बाजूला टाकण्यास बातमीचे हे कात्रण आणि त्यातील आशय कामी आला आणि डॉक्टर पुन्हा नव्या उमेदीने उभे राहिले. आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त झालेल्या या डॉक्टरांनी नुकताच या दांपत्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना ५१ हजारांचा पुरस्कार देऊन एका खास कार्यक्रमात त्यांना पुन्हा एकदा समाजापुढे आणले.
ही कहाणी सुरू होते साधारण दहा महिन्यांपूर्वी. डॉ. नितीन जोशी हे नांदेडमधील नामांकित पचनसंस्थाविकार तज्ज्ञ. आपली डॉक्टर पत्नी प्रज्ञा यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांना दीर्घकाळ नैराश्याने ग्रासलेले. त्यांच्या मनात कित्येकदा आत्महत्येचेही विचार आले. अशातच दै. ‘सकाळ’ च्या १३ सप्टेंबर २०२१ च्या सर्व आवृत्त्यांत प्रसिद्ध झालेली एका जिद्दी तरुण दांपत्याची प्रेरक कहाणी त्यांच्या वाचनात आली. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील
निश्चयी स्वभावाची प्राची
प्राची ही फलटण तालुक्यातीलच सांगवी गावची. ती उत्तम गाते. ऋषिकेश अन् प्राची एकाच कॉलेजमध्ये शिकले. दोघांच्या परिचयाचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर प्राचीने ऋषिकेशबरोबर विवाहाचा निर्णय घेतला. त्यातून गेल्या वर्षी दोघांचा अनोखा विवाह नोंदणी पद्धतीने झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.