Satara : मुख्यमंत्र्यांना पाहून विद्यार्थी भारावले, शिंदेंनी रस्त्यातच थांबवला ताफा

ज्येष्ठ नेते य़सवंतारव चव्हाण यांच्या पुण्यतिनिथी निमित्ता त्यांच्या समाधीस्थळी
Eknath Shinde
Eknath ShindeSakal
Updated on

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कृषी प्रदर्शानकडे निघालेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा चावडी चौकातून मुख्य रस्त्याकडे वळाला. मात्र येथील रामविलास लाहोटी कन्याशाळेजवळ भरधाव निघालेला वाहनांचा ताफा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच तो ताफा थांबावला. त्यावेळी शाळेतील मुलींच्या अभिवादानाला हात उंचावून त्यांनी दाद दिली. गाडीतून खाली उतरून त्यांनी त्या मुलींच्या जवळ जावून त्यांच्याशी हस्तादोंलनही केले. ताफ्यातील मुख्यमंत्र्यांनीच वाहन थांबवल्याने व्हीआयआयपी दौराही काही क्षणासाठी थांबला होता. तोही चिमुकल्या शाळेतील मुलींसाठी

ज्येष्ठ नेते य़सवंतारव चव्हाण यांच्या पुण्यतिनिथी निमित्ता त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्य मंत्री मंडळातील काही सहकारी येथे आले होते. त्यांचे विमानतळावर त्यांच्यागटातर्फे स्वागत झाले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यांना घेवून तो ताफा मुक्यरस्त्याने दत्तचौक, कृष्णा नाकामारेग समाधी स्थळी गेला. मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा व्हीआयपी अशल्याने कडकोट बंदोबस्त होता. समाधीस्थळी अभीवादन केले. त्यानंतर काही काळाने ती वाहने व त्यांचा ताफा त्याच दिशेने परत कृषी प्रदर्शनाकडे निघाला होता.

त्यावेळी त्यांच्या ताफ्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. प्रत्यकजण मुख्यमंत्र्यांना अभिवादन करत होते. त्याचवेळी येथील रामविलास लाहोटी कन्या प्रशालेच्या बाहेर त्या शाळेतील मुलीही थांबल्या होते. जवळपास शंभर मुली रस्त्याच्याकडेला मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या ताफ्याला पाहण्यासाठी थांबल्या होत्या. त्यांचा ताफा येताच मुलींनी जोरात ओरडत व हात उंचावतच मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्षवेधले. लहगान चिमुकल्या मुलींच्या त्या आगळ्या वेगळ्या हात उंचावण्याची भुरळ मुख्यमंत्र्यानाही पडली.

त्यांनी व्हिआयपी दोऱ्यातील त्यांचे वाहन अचानक थांबवले. थेट मुख्यमंत्री शिंदे यांचेच वाहन थांबल्यामुळे शासकीय अधिकारी, पोलिसांची तारांबळ उडाली. वाहन का थांबले, याचे कोडे त्यांना पडले. होते. मात्र काही क्षणातच त्यांच्या त्या शंकेचे निरसन झाले. कारण चिमुकल्या मुलींनी हात उंचावून केलेल्या अभिवादनाला मुख्यमंत्र्याना हसतमुखाने प्रतिसाद दिला. गाडीतून खाली उतरत त्यांनी त्या मुलींच्या घोळक्याकडे जात त्यांच्या हस्तादोंलनही केले. त्यामुळे मुलींनी हात उंचावत व ओरडत त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर अल्प काळासाठी थांबलेला मुख्यमंत्र्याचा दौरा पुन्हा कृषी प्रदर्शानकडे मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.