कोरोनामुळे साताऱ्यात सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठांची संख्या लक्षणीय

कोरोनामुळे साताऱ्यात सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठांची संख्या लक्षणीय
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचा आकडा दररोज वाढत आहे.  आत्तापर्यंत (शनिवार, ता.29) जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 357 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे सातारा तालुक्‍यात झाले आहेत. त्यापाठोपाठ कऱ्हाड तालुका आहे. सर्वांत कमी मृत्यू हे महाबळेश्‍वर तालुक्‍यात झाले आहेत. 

कोरोना संसर्गाचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. सध्या दररोज 500 पेक्षा जास्त कोरोनाबाधित समोर येत आहेत. दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांसाठी जिल्ह्यामध्ये पुरेसे बेडही उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या नागरिकांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. परंतु, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्याच प्रमाणात गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे.

जीएसटीबाबत अजित पवारांचे ते वक्तव्य दिशाभूल करणारे : देवेंद्र फडणवीस

त्यामुळे रुग्णांना आवश्‍यकता असेल तेव्हा व आवश्‍यक सुविधा उपलब्ध होताना दिसत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्स वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना त्याशिवायच मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. व्हेंटिलेटर्स उपलब्ध न झाल्यानेही अनेकांना मृत्यूला कवटाळावे लागल्याची उदाहरणेही समोर आलेली आहेत. बाधितांची वाढत संख्या व अपुऱ्या सुविधा यांच्या एकत्रित परिणामामुळे कोरोनाबाधितांची संख्याही जिल्ह्यात वाढत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 357 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.

आज मोनिकाचे बाबा हवे होते! हात प्रत्यारोपणानंतर आई कविता मोरे भावनिक

बाधितांच्या मृत्यूच्या संख्येमध्ये सातारा तालुका आघाडीवर आहे. सातारा तालुक्‍यात आत्तापर्यंत तब्बल 82 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. त्याखोलोखाल कऱ्हाड तालुक्‍यामध्ये 78 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वांत कमी आठ मृत्यू हे महाबळेश्‍वर तालुक्‍यात झाले आहेत. एकूण मृत्यूंच्या संख्येपैकी 264 जणांची प्रशासनाने आत्तापर्यंत वयोगटानुसार विभागणी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 20 वर्षांखालील एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. 20 ते 40 या वयोगटामध्ये15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 40 ते 60 या वगयोगटातील 77 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या बाधितांचे झाले आहेत. त्यांची संख्या 172 आहे. 

साताऱ्यातील दरोडाप्रकरणी पुण्याचे चौघे ताब्यात 

जिल्ह्यातील मृतांची तालुकानिहाय संख्या 

जावळी 19

कऱ्हाड 78

खंडाळा 15

कोरेगाव 21

महाबळेश्‍वर 8

माण 14

पाटण 31

फलटण 21

सातारा 82

वाई 39

खाशाबा जाधवांना पद्मविभूषण पुरस्कार द्या : खासदार श्रीनिवास पाटील

कोरोनाविरुद्ध महिला अधिक सक्षम 

मृत्यू झालेल्या 264 जणांमध्ये पुरुषांची संख्या खूप मोठी आहे. ती एकूण मृतांच्या संख्येच्या 80.16 टक्के म्हणजे 202 एवढी आहे. तर, महिलांच्या मृत्यूचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या तुलनेत 24.60 एवढे म्हणजेच 264 मृतांमध्ये केवळ 62 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला कोरोनाशी अधिक चांगला मुकाबला देत असल्याचे समोर येत आहे.
Video : केळघर ते लंडन.. बाप्पांचा मराठमोळा प्रवास

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.