सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहणार आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यात काेविड बाधितांची covid19 patient संख्या एक हजार पाचशेच्या घरात राहू लागली आहे. याबराेबरच म्युकरमायकाेसिस mucormycosis या आाजाराने तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. काेविड बाधितांची संख्या राेखण्यासाठी प्रशासन वारंवार अनेक उपाययाेजना करीत आहे. तरी देखील रुग्ण संख्या घटत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह shekhar singh यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यात एक जूनपर्यंत कडक लाॅकडाउन केला आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ही संख्या तशीच ठेवली असली तरी सर्व उपस्थितांकडे काेविड 19 झाला नसल्याचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. हा नवा आदेश एक जूनपर्यंत लागू असेल. satara-trending-news-covid19-report-neccessary-attend-marriage-ceremony
सातारा जिल्ह्यात काेविड 19 चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी सिंह यांनी शनिवारी (ता.22) एक जूनपर्यंत कडक लाॅकडाउन घाेषीत केले आहे. यामधून लग्न समारंभासाठी देखील निर्बंध आले आहेत. तुम्हांला लग्नाला साता-यात यायचे असेल तर तुमची काेविड 19 ची चाचणी निगेटिव्ह असायला हवी. अथवा लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले पाहिजेत.
सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहणार आहेत.
याचबरोबर लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित राहणा-या व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह पाहिजे. प्रमाणपत्र नसल्यास किंवा लसीकरण करून घेतलेले नसल्यास संबंधितास एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे. तसेच सबंधित आस्थापनेला दहा हजाराचा दंड केला जाणार आहे. धार्मिक, प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करताना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध केला आहे. तेथील कर्मचा-यांकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे असेही आदेशात नमूद केले आहे.
satara-trending-news-covid19-report-neccessary-attend-marriage-ceremony
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.