Satara: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद; नागरिकांची गैरसोय

Satara : रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.
Satara: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद; नागरिकांची गैरसोय
Updated on

Karad: पावसामुळे उत्तर कोपर्डे (ता. कऱ्हाड, जि.सातारा) हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.

Satara: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद; नागरिकांची गैरसोय
Satara Crime: खड्ड्यातील पाणी अंगावर उडाल्याचा आला राग, चौघांनी केली लोखंडी रॉडने मारहाण

नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन येथील लोकांना रेल्वे पुलाखालून गावात जावे लागते. पावसामुळे सध्या पुलाखाली चिखलाचा राडारोडा झाला आहे. दरम्यान, एक मालवाहक ट्रक सकाळी याच पुलाच्या तोंडावरच चिखलात रुतला. यामुळे पुलाखालून होणारी वाहतूक बंद झाली. जवळपास सहा तास वाहतूक बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दर वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून, ठेकेदारानेही हात वर केले आहेत.

Satara: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद; नागरिकांची गैरसोय
Satara Rain : साताऱ्यात मुसळधार पावसाचा जोर कायम; पाटण, महाबळेश्वरसह जावळीतील तब्बल 700 लोकांचे स्थलांतर

ट्रक अडकलेल्या पुलाच्या ठिकाणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावरील क्रेन, पोकलेन देण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने ट्रक बाजूला करण्यासाठी वेळ लागला. या रस्त्याचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने कायमचा सोडवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही तर नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Satara: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद; नागरिकांची गैरसोय
Satara : कोयना धरणातून नदीपात्रात आज पाणी सोडण्यात येणार; कृष्णा कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.