सातारा : वळसे ते कागल या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम पुन्हा लांबणीवर गेले आहे. मागील वर्षी झालेली टेंडर प्रक्रिया रद्द केल्याने आता कामाचे नव्याने अंदाजपत्रक करावे लागणार आहे. 2020-21 मध्ये ही सर्व प्रक्रिया करून टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास 2021 उजाडणार आहे. सध्यातरी केवळ महामार्गाशेजारील वाढीव जमीन संपादनाचे काम सुरू आहे.
वळसे ते कागल या महामार्गाचे सहापदीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू होत आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया होत आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूची जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये सेवा रस्ता तयार करण्यासाठी ही जमीन घेतली जाणार आहे. 41.28 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील महामार्गाच्या कडेला लागून जमिनी व घरे असलेल्यांना नोटीस आल्या आहेत. आजपर्यंत भूसंपादन प्रक्रियेचे 23 वेळा टेंडर निघाले होते. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे वळसे ते कागल या मार्गाच्या कामाला मुहूर्तच लागेना झाला आहे. 2018 मध्ये या 96 किलोमीटरच्या कामासाठी अडीच हजार कोटींची टेंडर प्रक्रिया सुरू होती. यामध्ये वाढीव जागा घेऊन त्यामध्ये ट्रक थांबे, स्वच्छतागृहे, इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबतचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यापूर्वी शेंद्रे ते पुणे हे 125 किलोमीटरचे सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्येही अनेक त्रुटी राहिल्याने हे काम अनेकदा बंद पाडण्याचे, तसेच पुलांचे स्लॅब कोसळण्याचे प्रकार झालेले होते. त्यामुळे हे प्रकार नवीन सहापदरीकरणाच्या कामात होऊ नये, यासाठी एनएचआयने खबरदारी घेण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 900 कोटी व 500 कोटींची अशी दोन टेंडर काढण्यात आली होती. मात्र, 2019 मध्ये ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे एनएचआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता वाढलेल्या किमतीनुसार या 96 किलोमीटर कामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे. त्यानंतर टेंडर प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी साधारण तीन ते चार महिने जाणार आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढलेला असल्याने या कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या केवळ भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर कामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करावे लागेल. 2018 मध्ये अडीच हजार कोटींचे हे काम होते. आता त्यामध्येही वाढ होणार आहे. त्यानुसार वाढीव किमतीसह नव्याने अंदाजपत्रक करून त्याला मंजुरी देऊन मगच टेंडर प्रक्रिया होणार आहे.
साधारण टेंडर प्रक्रिया होण्यासाठी वर्षाअखेर होईल. त्यामुळे 2021 मध्ये कागल ते वळसे या कामाच्या सहापदीकरणाला हात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गाशेजारील जमिनी जाणाऱ्या लोकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
त्रुटी दूर होणार का...
पुणे ते शेंद्रे या महामार्गाचे सहापदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. आज काम पूर्ण होऊनही महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वळसे ते कागल या सपदरीकरणात पुणे ते शेंद्रे दरम्यान, राहिलेल्या सर्व त्रुटी दूर होऊन अधिक चांगल्या प्रकारे व जादा सुविधा देणारे काम होईल, अशी आशा वाहनचालकांना लागली आहे.
सातारा जिल्ह्यात 20 रुग्ण वाढले; क्षेत्र माहुली, फलटण, बागलवाडी, शिरसवाडी, म्हासूर्णे, तारुख, गोवारे, हवालेवाडीत शिरकाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.