Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

Satara Vidhan Sabha Election 2024 : सर्व उमेदवारांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार समाजमाध्यमातून करत आहे. व्हॉटस्‌ॲपसारख्या माध्यमातून कार्यकर्ते शेकडो मतदारांच्या थेट घरात पोचत आहेत.
Satara Vidhan  sabha Election 2024
Satara Vidhan sabha Election2024 Election 2024sakal
Updated on

सातारा : सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्व उमेदवारांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार समाजमाध्यमातून करत आहे. व्हॉटस्‌ॲपसारख्या माध्यमातून कार्यकर्ते शेकडो मतदारांच्या थेट घरात पोचत आहेत.

मतदार देखील कार्यकर्त्यांकडून पाठविले जाणारे उमेदवारांचे संदेश, रिल्स आदी पाहण्यासाठी संदेशावर क्लिक करतात. दररोज शेकड्याने असे संदेश विविध ग्रुपवर पोस्ट होत असतात. दरम्यान, याचा फायदा हॅकर्स घेऊ लागले आहेत. त्यातून अनेकांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बॅंक खात्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्या अनेकांच्या मोबाईलवर एपीके फाइल येऊ लागल्या आहेत. या एपीके फाइलच्या माध्यमातून शासकीय योजनांतून आर्थिक लाभ, सवलतीच्या जाहिराती अशा स्वरूपात नागरिकांना आमिष दाखवले जात आहे.

नागरिकांकडून अशा फाइल्सवर क्लिक केले गेले, की त्या डाऊनलोड किंवा इन्स्टॉल होताहेत. त्यानंतर संबंधितांचे मोबाईलवरील नियंत्रण जात आहे, अथवा मोबाईल हँग (यंत्रणा ठप्प) होत आहे. यामुळे नागरिक गोंधळून जातो.

दरम्यान, ज्याचा मोबाईल हँग होता त्याच्या मोबाईलवरून अन्य ग्रुपवर एपीके फाइल इतर सर्व ग्रुपवर पाठविली जाते. त्यातूनच मग ऑनलाइन पैशांची देवाण घेवाण करणारे ॲप हॅक करण्याचा प्रयत्न होतो आणि बँक खात्यांना धोका पोचत आहे.

त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता नागरिकांनी समाज माध्यमातून येणारी कुठलीही एपीके फाइल डाऊनलोड करू नये, अथवा उघडू नये. विशेष म्हणजे या पीडीएफ स्वरूपातील फाइल नसतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या संदेशांपासून

  • राहा सावध

  • पीएम किसान लिस्ट.एपीके

  • घरकुल योजना.एपीके

  • सीएससी सेंटर.एपीके

  • एसबीआय रिवॉर्ड.एपीके

  • एमीजीबी रिवॉर्ड.एपीके

  • सोलर पंप लिस्ट. एपीके

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.