किरण माने प्रकरण चिघळलं... 'त्या' भेटीनंतर मालिकेचं शूटिंग रोखण्याची नोटीस

'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेतून मुख्य पात्र साकारणाऱ्या किरण माने याची चॅनेल आणि निर्मात्यांनी हकालपट्टी केली होती.
Kiran Mane
Kiran Maneटीम ई सकाळ
Updated on

सातारा : छोट्या पडद्यावरील 'मुलगी झाली हो...' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण माने सध्या चर्चेत आहे. राजकीय पोस्टच्या संदर्भातून स्टार प्रवाह वाहिनीने त्याला थेट मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप त्याने केला. यानंतर किरणच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीमच सुरू झाली आहे. दरम्यान माने यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे,

या भेटीनंतर संपूर्ण प्रकरणात आता नवे ट्विस्ट निर्माण झाले आहे. या कलाकाराला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत असताना आता साताऱ्यातील एका गावच्या सरपंचांनी थेट मालिकेच्या टीमला धमकीवजा इशारा देत अभिनेत्याची पाठराखण केली आहे. (Satara Village Gulumb Grampanchayat On Mulagi Zali Ho Fame Kiran Mane controversy)

'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेतून मुख्य पात्र साकारणाऱ्या किरण माने यांची चॅनेल आणि निर्मात्यांनी हकालपट्टी केली होती. हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत आहे. मोठमोठ्या कलाकारांनी यावर टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून मराठी सिनेसृष्टीमध्ये झुंडशाही आणि दडपशाही केली जात असल्याचा आरोप खुद्द मानेंनी केला होता. (Kiran Mane)

यात आता स्टार प्रवाह या चॅनेलवरील मालिकेच्या चित्रिकरणात अडचणी निर्माण होणार आहेत. या मालिकेचे चित्रिकरण सातारामधील वाई तालुक्यातील ज्या गुळुंब गावात सुरु आहे त्या गावातून मालिकेला विरोध करण्यात आला आहे. या मालिकेच्या चित्रिकरणाची परवानगीच ग्रामपंचायतीने रद्द केली आहे. त्यामुळे या वादाला एक नवे वळण लागले आहे.

Kiran Mane
अभिनेते किरण माने यांनी शरद पवारांची घेतली भेट

किरण मानेंना मालिकेतून काढल्याप्रकरणी महाराष्ट्रातील अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. त्याप्रकरणी मानेंनी आरोप करत इंडस्ट्रीत दडपशाही आणि झुंडशाही चालते अशा शब्दांत आपला रोषही व्यक्त केला आहे. त्यानंतर आता साताऱ्यातील गावकरी आक्रमक भूमिकेत समोर आले आहेत. कलाकारासोबत दुजाभाव करुन त्याला कोणतीही सूचना न देता काढून टाकणाऱ्या प्रवृत्तींना आमच्या हद्दीत प्रवेश नाही, असा निर्वाणीचा इशारा ग्रामपंचायतीने मालिकेच्या टीमला दिला आहे. यासंदर्भात ग्रामपंचयतीच्या लेटर पॅडवरुन एक निवेदन स्टार प्रवाह आणि संबंधित मालिकेच्या टीमला देण्यात आले आहे.

Kiran Mane
Kiran Mane| चॅनलनी माझ्याशी बोलायला हवं होतं, ही मुस्कटदाबी सहन करणार नाही,ऐका किरण माने काय म्हणतात

व्हायरल होणाऱ्या निवेदनात नेमक म्हटलंय तरी काय?

गुळुंब गावच्या ग्रामपंचायतीने स्टार प्रवाह वाहिनीच्या 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या टीमला जे निवेदन दिले आहे त्यात लिहिलंय की, राजकीय भुमिका मांडणाऱ्या कलावंताला मालिकेतून काढलेल्या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो.

महाराष्ट्र अजूनही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपतो. ही गोष्ट विसरू नका. मनुवादी विचारांच्या लोकांना आम्ही आमच्या गावात चित्रिकरणासाठी परवानगी देणार नाही. अशा प्रवृत्तींना इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नसेल, असा इशाराही ग्रामपंचायतीने या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. ह्या निवेदनाची कॉपी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ग्रामपंचायतीने सरपंचाच्या सहिशिक्यानिशी दिलेल्या निवेदनासंदर्भात मालिका निर्मात्यांची भूमिका समजू शकलेली नाही. साताऱ्यामध्ये सुरु असलेल्या चित्रकरणात काही अडथळा निर्माण झाल्याची तक्रार त्यांच्याकडून अद्याप झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.