Satara News: चुकीच्या पद्धतीने तक्रार दाखल केल्याने वकिल संघाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा..

Wai Lawyers' Association marched to the police station to protest against being evicted: महिला पोलिसाने मारली वकिलाच्या श्रीमुखात; चुकीच्या तक्रारीबद्दल हवालदारावर कारवाईची मागणी.
lawyers' association at wai police station
lawyers' association at wai police stationsakal
Updated on

Wai, Satara: न्यायालयाच्या आवारात दुचाकी काढण्याच्या कारणावरून पुणे ग्रामीण पोलिस दलातील महिला शिपाई ऐश्वर्या दत्तात्रय बाचल यांनी वकील योगेश जमदाडे यांच्या श्रीमुखात मारली. गुन्हा नोंद करताना शिपाई महिलेस मदत करण्याच्या हेतूने चुकीच्या पद्धतीने तक्रार नोंदवून ॲड. जमदाडे यांना पोलिस ठाण्यातून हाकलून दिल्याच्या निषेधार्थ वाई वकील संघाने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

वाई न्यायालयाच्या फाटकाजवळ काल झालेल्या घटनेचा निषेध करीत आज सकाळी संघाचे सदस्य न्यायालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चाने आले. त्यांच्या हातात ऐश्वर्या बाचल यांच्या निषेधाचे फलक होते. पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना अध्यक्ष ॲड. रवींद्र भोसले, उपाध्यक्ष ॲड. भारती कोरवार, सचिव ॲड. अक्षय भाडळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

lawyers' association at wai police station
Waghnakh: लंडन वरुन थेट राजधानी साताऱ्यात येणार वाघनखे.. विशेष विमान उद्या दाखल होणार

निवेदन स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक शहाणे यांनी संबंधित पोलिस शिपाई ऐश्वर्या बाचल ही माफी मागण्यास तयार आहे, असे सांगितले. गुन्ह्याचा अहवाल पुणे ग्रामीण पोलिसांना पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ठाणे अंमलदार शमशाद मुजावर यांनी ऐश्वर्या बाचल यांना मदत करण्याच्या हेतूने तक्रारदार यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रार न नोंदवता चुकीच्या पद्धतीने तक्रार नोंदवली, तसेच त्यांना पोलिस ठाण्यातून हाकलून दिले. हवालदार मुजावर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन कामामध्ये हेतुपुरस्सर हलगर्जीपणा केल्याबद्दल शमशाद मुजावर यांच्यावर कारवाई करावी, असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी ॲड. रवींद्र भोसले यांनी कायद्याचा गैरवापर झाल्यास वकिलांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होईल, असे सांगितले. ॲड. उमेश सणस म्हणाले, ‘‘न्यायव्यवस्थेवर केलेला हा हल्ला आहे. आम्ही रागाच्या, हक्काच्या भावनेने आलो आहोत. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी मुजोर कर्मचाऱ्यांना माफी दिली जाऊ नये.’’

या वेळी ॲड. चारुशीला गिमवेकर, ॲड. विठ्ठल कदम, ॲड. महेश शिंदे, ॲड. गणेश मोरे, ॲड. स्मिता जाधव, ॲड. जयंत गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.

lawyers' association at wai police station
Mukhyamantri Tirth Darshan Yojana : तीर्थ दर्शन योजनेचे पुण्य मिळणार चिठ्ठीने; लाभार्थी निवड होणार लॉटरीद्वारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.