नदीकाठच्या ग्रामस्थांनाे सावधान! कोयना धरणातून पाणी साेडले

नदीकाठच्या ग्रामस्थांनाे सावधान! कोयना धरणातून पाणी साेडले
Updated on

कोयनानगर (जि. सातारा) : गेल्या चार दिवसांपासून सरीवर सरी पडणाऱ्या पावसाचा जोर कोयना धरण (koyna dam) पाणलोट क्षेत्रात वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी (heavy rain) होत असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने आज (शुक्रवार) 2100 क्येसूक पाण्याचा विसर्ग काेयना साेडला. सध्या धरणात 24 हजार 275 क्युसेक पाण्याची आवक आहे अशी माहिती धरण व्यवस्थापानाने दिली. (satara-water-released-koyna-dam-breaking-news)

धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर 626, नवजा 668, तर महाबळेश्वरला 747 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची जलपातळी 2086.4 फूट झाली असून, धरणाचा पाणीसाठा 35.46 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पावसाचा जोर कायमच असल्याने मनमोहक धबधब्याचा परिसर असणाऱ्या निसर्गरम्य कोयना विभागातील सर्व धबधबे प्रवाहित होऊन ओसंडून वाहू लागले आहेत.

नदीकाठच्या ग्रामस्थांनाे सावधान! कोयना धरणातून पाणी साेडले
Video पाहा : कास तलाव भरला; पर्यटकांना वजराई धबधब्याचे आकर्षण

कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार म्हणाले की सांगली पाटबंधारे विभागाचे दहा दिवसापूर्वी नदीतून माेठ्या फळ्या काढण्याचे काम सुरु असल्याने नियमीतपणे सुरु असलेले हे पाणी बंद केले होते. पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून आरक्षित केलेला पाणीसाठा वापराविना संपून जावू नये व संभाव्य पुराच्या वेळी हे पाणी काढावे लागणार आहे. पूरामध्ये हे पाणी विनाकारण सोडावे लागू नये म्हणुन हे पाणी सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नदीकाठच्या ग्रामस्थांनाे सावधान! कोयना धरणातून पाणी साेडले
पावसाचा रुद्रावतार; म्हारवंडला भूस्खलन, ग्रामस्थ भयभीत

दरम्यान नदीकाठच्या लोकवस्ती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आवश्यक त्या खबरदाऱ्या घेण्याचे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनासह महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.