सातारा : यंदा 147 गावांत पाणी टंचाईचा मुक्काम; सहा तालुक्यात जाणवणार टंचाई

वेळीच नियोजन करणे आवश्यक आहे
सातारा : यंदा 147 गावांत पाणी टंचाईचा मुक्काम; सहा तालुक्यात जाणवणार टंचाई
सातारा : यंदा 147 गावांत पाणी टंचाईचा मुक्काम; सहा तालुक्यात जाणवणार टंचाई sakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत सातारा, जावळी, कऱ्हाड व वाई तालुक्यांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला असून, पाटण, कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खटाव, माण, फलटण, कोरेगाव, पाटण व महाबळेश्वर तालुक्यांतील भूजल पातळी काहीशी खालावल्याने १४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील जावळी, कऱ्हाड, खंडाळा, खटाव, कोरेगाव, माण, सातारा व वाई तालुक्यांमध्ये निरीक्षण विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये शून्य ते ०.४५ मीटर इतकी वाढ झाली आहे. महाबळेश्वर, पाटण व फलटण तालुक्यांमध्ये निरीक्षण विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये सरासरी ०.६६ मीटर इतकी घट दिसत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सप्टेंबरअखेर पडलेल्या पावसामुळे झालेले पुनर्भरण व उपसा याचा अभ्यास करण्यासाठी १०६ निरीक्षण विहिरींची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये हे चित्र समोर आले आहे. १०६ विहिरींपैकी ४० विहिरींमध्ये पाणीपातळीत घट झाली आहे. खटाव तालुक्यातील ३१, माण- ३०, फलटण- ३०, कोरेगाव २३, पाटण-२५, महाबळेश्वर -८ अशा एकूण १४७ गावांत संभाव्य पाणीटंचाईचे संकट आहे.

खटाव तालुक्यातील मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, गारवडी, उंबरमळे, दरजाई, कातळगेवाडी, भांडेवाडी, भुरकवडी, डांबेवाडी, कातरखटाव, येलमरवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, पळसगाव, अंभेरी, कोकराळे, जायगाव, रेवलकरवाडी, अंबवडे, कामती, निमसोड, अनफळे, कान्हरवाडी, कानकात्रे, पडळ, ढोकळवाडी, हिवरवाडी, कलेढोण, मायणी या गावांत टंचाई जाणवणार आहे. माण तालुक्यातील गरडाचीवाडी, वारुगड, खोकडे, मोगराळे, अनभुलेवाडी, बिजवडी, जाधववाडी, पाचवड, राजवडी, तोंडले, पांगरी, विरोबानगर, वावरहिरे, येळगाव, वडगाव, भांडवली, बोडके, कासारवाडी, मलवडी, सत्रेवाडी, शिरवली, देवापूर, शिरताव, कारखेल, शंभूखेड, हवालदारवाडी, इंजबाव, खडकी, वरकुटे म्हसवड, भाटकी येथे टंचाई जाणवेल. फलटण तालुक्यातील आळजापूर, कापशी, सासवड, आरडगाव, चव्हाणवाडी, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, नांदल, घाडगेमळा, शेरेचीवाडी, कुरवली खुर्द, मांडवखडक, विंचुर्णी, मानेवाडी, फरांदवाडी, तावडी, खडकी, वाघोशी, पिराचीवाडी, शेरेचीवाडी, ताथवडा, वाठार निंबाळकर, मिरढे, शेरेशिंदेवाडी, धुमाळवाडी, दुधेबावी, वडले, अंदरुड, जावली या गावांत टंचाईची शक्यता आहे. कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी, भावेनगर, गिघेवाडी, जगतापवाडी, कोलवडी, पळशी, परतवडी, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड, सोनके, भंडारमाची, भाटमवाडी, बोधेवाडी, बोरजाईवाडी, चिमणगाव, रामोशीवाडी, सांगवी, एकंबे, खिरखिंडी, सोनगाव, शेल्टी, शिरंबे या गावांत टंचाईची शक्यता आहे. पाटण तालुक्यातील चवलीवाडी, नेरळे, झाकडे, केळोली, खराडेवाडी, बोरगेवाडी, धनगरवाडी, फडतरवाडी, डोंगलेवाडी, गवळीनगर, कोकिसरे, बगलवाडी, भोसगाव, जाधववाडी, जानुगडेवाडी, कोळेकरवाडी, मालदन, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, रेठरेकरवाडी, शिद्रुकवाडी, सुतारवाडी, टेळेवाडी, तुपेवाडी, उमरकांचन या गावांत टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ, राजपुरी, कुंभरोशी, कुमठे, आचली, कुरोशी, मजरेवाडी, टाकेवाडीत टंचाईची स्थिती आहे. फलटण तालुक्यात धोम-बलकवडी धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन केल्यास टंचाईची तीव्रता कमी जाणवेल.

सातारा : यंदा 147 गावांत पाणी टंचाईचा मुक्काम; सहा तालुक्यात जाणवणार टंचाई
रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा

"यंदा झालेला पाऊस व निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा तुलनात्मक अभ्यासावरून स्थानिक परिस्थितीनुसार काही गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने वेळीच नियोजन करणे आवश्यक आहे."

- एम. एम. गडकरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग

...काय केले पाहिजे

  • पिकांसाठी ठिबक, स्प्रिंकलर अशा साधनांचा सिंचनासाठी वापर

  • भूजल अधिनियमाचा काटेकोर वापर करावा

  • विहीर पुनर्भरण, वनीकरण, कुरणविकास, मृदसंधारणाची कामे व्हावीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.