महापूर आला तर 556 कुटुंबांच काय होणार?

patan
patan
Updated on

पाटण (जि. सातारा) ः गतवर्षीच्या आपत्तीतून कोणीही धडा घेतला नाही. त्यामुळे तालुक्‍यातील 556 कुटुंबांसमोर महापुराची टांगती तलवार उभी आहे. पूरपरिस्थितीच्या आपत्तीवर कोणतेही उपाय केले नसल्याने यावर्षी पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली तर 2019 ची पुनरावृत्ती होणार, असे एकूण चित्र आहे. त्यामध्ये पूररेषेत झालेल्या नवीन घरांची भर पडणार असल्याने प्रशासनाचा व्याप वाढणार आहे. 

गतवर्षी जून महिन्यात काही प्रमाणात पडलेला पावसाचा अपवाद सोडला तर जुलै महिन्याच्या शेवटी मॉन्सूनच्या पावसाचे दमदार आगमन झाले आणि पाच ऑगस्टपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला होता. कोयना काठावरील शेती आणि कऱ्हाड-चिपळूण महामार्गासह तालुक्‍यातील अनेक रस्ते बंद झाले होते. 11 ऑगस्टनंतर जनजीवन पूर्वपदावर यायला सुरवात झाली होती. मात्र, त्यातून सावरायला एक महिन्याहून जादा काळ गेला होता. पाटण, हेळवाक, शिवंदेश्वर, शिरळ, वांझोळे धक्का, डोणीचावाडा, नावडी, बनपेठवाडी, ज्योतिबाचीवाडी, मिरगाव, गुंजाळी, जमदाडवाडी, विहे, गिरेवाडी, मुंद्रुळ-हवेली, म्हावशी, अडुळ, त्रिपुडी, कोयनानगर, मणेरी व रासाटी या 22 गावांना महापुराचा फटका बसला होता. 556 कुटुंबांतील दोन हजार 315 लोकांना स्थलांतरित करावे लागले होते. त्यामध्ये शिरळ, पाटण, जमदाडवाडी, म्हावशी, हेळवाक व नावडी गावांतील कुटुंबांची संख्या जास्त होती. सलग दहा दिवस प्रशासनावर महापुराचा ताण होता. 

या 20 गावांना कोयना नदीच्या पाण्याचा व इतर 20 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. महापूर ओसरला, पंचनामे झाले आणि प्रशासनाबरोबर जनतेलाही महापुराचा विसर पडला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा व तालुकास्तरावर फक्त आढावा व पर्यायी उपायांबाबत नियोजनाचे आराखडे तयार झाले. 

प्रशासनाने कोयना काठावरील शेतकऱ्यांना नोटीस काढून शेतीपंपांची खबरदारी घेण्यासाठी सावधान केले आहे. तशा नोटिसा शेतकऱ्यांना तलाठ्यांमार्फत पोच झाल्या आहेत. मात्र, खरा प्रश्न पूररेषेत येणाऱ्या घरांचा. त्यातील 556 कुटुंबांत राहणाऱ्या दोन हजार 315 लोकांचा. या कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी कोणतेही नियोजन प्रशासनाकडे, लोकप्रतिनिधींकडे अथवा झळ बसलेल्या कुटुंबांकडेही नाही. पूररेषेतील 556 कुटुंबांसमोर महापुराची टांगती तलवार आहे. या वर्षात पूररेषेत बांधकाम झालेल्या नवीन घरांनाही संभाव्य महापुराला सामोरे जावे लागणार आहे. पूररेषेत बांधकाम होत असताना गावस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी यांच्याबरोबर गावच्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य काय करत होते, याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.