Satara: जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष

Vidhabh Session 2024 : विधानसभा मतदारसंघातील प्रश्न अधिवेशनात मांडून त्याला आवश्यक निधी मिळवून घेण्यासाठी सर्वच आमदारांनी तयारी सुरू केली आहे
 जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष
Satara:sakal
Updated on

Problems Of Satara District: गेल्या पाच वर्षांत औद्योगिक वसाहतीत एकही नवीन उद्योग आलेला नाही, त्यामुळे रोजगार निर्मितीकडे झालेले दुर्लक्ष, कऱ्हाड विमानतळाचे रखडलेले विस्तारीकरण, कऱ्हाड-चिपळूण महामार्गाचे अपुरे काम, कोयनेतील बोटिंग सुविधेकडे झालेले दुर्लक्ष, तारळी धरण परिसरातील अदानींचा संभाव्य वीज प्रकल्प, उपसा सिंचन योजनांची वाढविलेली पाणीपट्टी हे विषय गुरुवारपासून (ता. २७) सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष
Satara News : कृष्णा नदीकाठी कचऱ्याचे डंपिंग; पावसाने पाणी वाढून कचरा होणार कृष्णार्पण, आरोग्याचा प्रश्न निर्माण

जिल्ह्यात सत्ताधारी आमदारांची संख्या अधिक असून, विरोधी आमदार केवळ तीनच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्‍नांना सर्वाधिक वाचा कोण फोडणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा मतदारसंघातील प्रश्न अधिवेशनात मांडून त्याला आवश्यक निधी मिळवून घेण्यासाठी सर्वच आमदारांनी तयारी सुरू केली आहे. आगामी तीन, चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील जास्तीतजास्त प्रश्न या पावसाळी अधिवेशनात मार्गी लावण्याचा जिल्ह्यातील आमदारांचा प्रयत्न असणार आहे. सध्या जिल्ह्यातील झाडाणीचा विषय अधिक संवेदनशील आहे.

तसेच महाबळेश्वर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा विषय ही ज्वलंत आहे. या दोन्ही विषयांवर मात्र, कोणीही प्रश्न विचारलेला दिसत नाही. सध्या जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीचे सहा आमदार असून, केवळ दोन आमदार हे विरोधी पक्षांचे आहेत, तसेच विधान परिषदेचे दोन आमदार असून, एक महायुतीसोबत तर दुसरा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विरोधी आमदारांनाच जिल्ह्यातील विविध प्रश्नावर आवाज उठवावा

 जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष
Satara Water Crisis : सातारा जिल्ह्यात अद्यापही १०० टँकर सुरू; शेतीचा प्रश्‍न सुटला; पण पिण्याच्या पाण्याची टंचाई

माण- खटाव

म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसी प्रश्न

प्रकल्पांची कामे

पश्चिम-उत्तर माण तालुक्यातील पाणीप्रश्न

ग्रीन कॉरिडॉर महामार्गाचे काम

अवैध वाळू उत्खनन

गाळमुक्त धरण प्रभावी अंमलबजावणी नाही

कऱ्हाड-दक्षिण, कऱ्हाड-उत्तर

तासवडे एमआयडीसीत मोठे उद्योग नाहीत

कऱ्हाड शहरातील पूर संरक्षक भिंतीचे अपूर्ण काम

टोल आकारणी

कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण

नदीकाठच्या गावांना संरक्षक भिंतीची गरज

पाटण

कऱ्हाड- चिपळूण रखडलेले महामार्गाचे काम

तारळी धरण परिसरात अदानींच्या वीज प्रकल्पाचा वाद

उपसा सिंचन योजनांची वाढविलेले पाणीपट्टी

पोलिस प्रशिक्षण केंद्राचे काम

मुख्यमंत्र्यांनी पर्यटनाच्या सर्व योजना महाबळेश्वरला पळविल्या

कोयना जलाशयातील बोटिंगचा प्रश्न

फलटण

नीरा- देवघर प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपलाइनमधून नेणे

उपसा सिंचन योजना

फलटण शहराला रिंग रोड बांधणे

नीरा-भीमा स्थिरीकरण

फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट

फलटण सिंचन भवन

पालखी मार्ग

फलटण बारामती रेल्वे मार्ग

 जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष
Satara News : सातारा जिल्ह्यात २२३ शाळा मॉडेल स्कूल करणार; याशनी नागराजन

कोरेगाव

उत्तर कोरेगाव भागातील भाडळे खोऱ्यास दोन टीएमसी अतिरिक्त मंजूर असूनही त्यासाठी निधीची आवश्‍यकता

वसना, वांगना योजनांचे निकृष्ट कामांचा विषय

एमआयडीसीकडे दुर्लक्ष झाल्याने रोजगाराचा अभाव

वाई, महाबळेश्वर,

खंडाळा

औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग नाहीत

पूर्व भागातील ३२ गावांचा पाणी प्रश्न

कवठे केंजळ योजना नीट चालत नाही

वाई शहरातील पर्यायी पुलाचा प्रश्न

सांडपाणी व्यवस्था निधी नाही

धोममधून वाई शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना

पर्यटन विकास चालना देण्यासाठी आराखडा

ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णोद्धाराचा प्रश्न

सातारा-जावळी

बोंडारवाडी सिंचन प्रकल्प

औद्योगिक वसाहतींत नवीन प्रकल्प आणणे

अतिरिक्त औद्योगिक वसाहतीला चालना देणे

अपूर्ण कालवे पाइपलाइनने बंदिस्त करणे

सातारा शहरातील हद्दवाढीसाठी निधी

कचरा वर्गीकरण व खत प्रकल्प

वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

घरपट्टीचा प्रश्न

मेडिकल कॉलेजच्या निधीचा प्रश्न

 जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष
Satara Rain : तासाभराच्या पावसाने शेतकरी सुखावला;आरडगाव परिसरातील चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.