जिल्हा परिषदेचे विद्यार्थी जाणार इस्रोला

राज्यातील पहिलाच उपक्रम; स्कॉलरशीप मिळालेल्या ४० विद्यार्थ्यांना संधी
Satara ZP
Satara ZPSakal
Updated on

सातारा - आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळण्यासाठी स्कॉलरशीप मिळविलेल्या सातारा जिल्हा परिषदेतील एकूण ४० विद्यार्थ्यांना बंगळूर येथील इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) या भारताला अंतराळ संशोधनात जगभरात पोचविणाऱ्या संस्थेतील अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोला नेणारा राज्यातील जिल्हा परिषदेचा हा पहिलाच उपक्रम आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त व डिजिटल पद्धतीने शिकविले जात आहे. या नवनवीन उपक्रमांमुळे झेडपीच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध क्षेत्रांत नाव कमविले आहे. याच पद्धतीने नव-नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

देशाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या जगभरातील विविध देशांशी स्पर्धा करता येईल आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधांचे जाळे संपूर्ण देशभर पसरविणे शक्य होत असून, त्या तंत्रज्ञानाद्वारे देश विकसित देशाच्या शिखरावर पोचविणाऱ्या इस्रो या संस्थेला जिल्हा परिषदेचे विद्यार्थी भेट देणार आहेत. अंतराळातील अत्याधुनिक उपगृहाविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती झेडपीतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांना पुढील काळात निश्‍चितपणे फायदा होणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकही जाणार असून, चार दिवस इस्रोच्या विविध विभागांना भेटी देऊन नावीन्यपूर्ण माहिती गोळा केले जाणार आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषदेच्या वतीने अंतिम स्वरूप दिले जात असून, पुढील काही दिवसांत या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

सातारा जिल्हा परिषद सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. याचाच एक भाग म्हणून शालेय स्तरावर असतानाच विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी स्कॉलरशीप मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बंगळूर येथील इस्रो संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.