अरेरे ! शिरवळच्या नव्वदीतल्या आजीचा मृत्यू ; सातारा जिल्ह्यात 76 कोरोनाबाधितांची वाढ

अरेरे ! शिरवळच्या नव्वदीतल्या आजीचा मृत्यू ; सातारा जिल्ह्यात 76 कोरोनाबाधितांची वाढ
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात प्रवास करुन आलेले दाेन, निकट सहवासित 53, सारीचे 11 आणि अन्य एक तसेच विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन टेस्ट किटद्वारे नऊ असे एकूण 76 संशयितांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नागरिक काेराेनाबाधिताचा मृत्यू झाल्याची नाेंद झाली आहे.
रेशन दुकानदारांकडून उत्पन्नाची पडताळणी! अजबच प्रकार 

सातारा जिल्ह्यातील स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात,शिरवळ (ता. खंडाळा) येथील 90 वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील 76 जणांचा आलेल्या काेराेनाेबाधित अहवालात वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील 27, 49 वर्षीय पुरुष, पोलिस वसाहत येथील 65, 4, 30, 4, 18 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, सिद्धांतवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, बोपेगाव येथील 51 वर्षीय महिला, सेंदुरजने 39, 40 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10, 8 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला, कण्हेर येथील 40, 45, 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात 

कराड तालुक्यातील शामगांव येथील 53 वर्षीय पुरूष, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 38 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, चचेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, तारुख येथील 2, 2 वर्षीय बालिका, सैदापूर येथील 54 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील जावळे येथील 57 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील अनपटवाडी येथील 1, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 31, 22 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील वडूज येथील 29 वर्षीय पुरुष, डिस्कळ येथील पुरुष, पाटण तालुक्यातील तारळे येथील 25 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, मिरगांव येथील 18 वर्षीय महिला, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय पुरुष, आंमवडे येथील 15 वर्षीय पुरुष, 25, 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Video : ऐका क्वारंटाइन वाल्यांची कथा 

त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले... 

फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 53, 25 वर्षीय पुरुष, 42, 22 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 43, 15, 50, 16 वर्षीय पुरुष, 38, 43, 18, 65 वर्षीय महिला, उपळवे येथील 26 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, महतगल्ली येथील 45 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील राजवडी येथील 37 वर्षीय पुरुष, 28, 12 वर्षीय महिला, गोंदवले (बु) येथील 21 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 83 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच अँटीजन टेस्टनुसार सातारा येथील दाेन, शिरवळ येथील दाेन, पळशी येथील एक, पुनवडी येथील चार जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.