गृहराज्यमंत्री सुरक्षित, युवकांना जेरबंद करु : अजयकुमार बन्सल

Shamburaj Desai
Shamburaj Desai
Updated on

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (shambhuraj desai) हे आपल्या निवासस्थानी आहेत. ते सुरक्षित (safe) आहे. त्यांच्या विषयी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. पाेलिसांचा (satara police) तपास सुरु आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (ajaykumar bansal) यांनी माध्यमांना दिली. (shambhuraj-desai-is-safe-says-satara-police-marathi-news)

राज्याचे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडून शहरातून फेरफटका मारत हाेते. पायी चालत असलेल्या मंत्री देसाईंचे दोन युवक चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत हाेते. हे दाेघे एका दुचाकीवर हाेते. ही बाब मंत्री देसाईंच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्याने युवकाने दरडावले. परिणामी युवकांनी तेथून पळ काढला. काही वेळानंतर पुन्हा युवक मंत्री देसाईंवर पाळत ठेवण्यासाठी आले आणि पाेलिसांना पाहताच दुचाकी वेगात नेली.

Shamburaj Desai
'मराठे पाठीमागून वार करत नाहीत, समाेरुन करतात'

या प्रकाराची माहिती मंत्री देसाई यांनी पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ज्या भागात मंत्री देसाई फेरफटका मारत हाेते. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. संबंधित युवकांचा शोध सुरू केला.

Shamburaj Desai
उन्‍हाळी सुटीचा आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून शाळा सुरु

सातारा पाेलिस दलाने रविवारी रात्री उशिरा गृहराज्यमंत्री देसाई हे घरी सुरक्षित आहेत. काळजीचे कारण नसल्याचे पत्रक प्रसिद्ध करत केले. याबराेबरच पाेलिस या प्रकाराचा कसून तपास करीत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.