शरद पवारांच्या पुढाकारातून साताऱ्यात 100 बेडचे रुग्णालय

proposed container hospital
proposed container hospital
Updated on

सातारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत (covid19 third wave) रुग्णांना बेड कमी पडू नयेत, यासाठी साताऱ्यात कंटेनरमधील १०० बेडचे कोरोना रुग्णालय (corona hospital) उभारले जाणार आहे. इंडो अमेरिकन फाउंडेशनच्या (indo american foundation) वतीने हे रुग्णालय होत आहे. त्यामध्ये १६ आयसीयू बेड (icu) , ८४ ऑक्सिजन बेडचा (oxygen bed) समावेश असणार आहे. हे कंटेनर रुग्णालय फोल्डेबल असून, संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या पुढाकारातून हे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू असून, तिसऱ्या लाटेत रुग्णांना बेड कमी पडू नयेत, यासाठी हे कंटेनरमधील रुग्णालय उभारले जाणार आहे. sharad-pawar-covid19-hospital-satara-indo-amercian-foundation-marathi-news

सातारा जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हिटी रेट ६.८५ टक्के आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची ‘रेड झोन’मध्ये नोंद झालेली होती; पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यात येऊन प्रशासनासह आरोग्य विभागाची कानउघडणी केली. यामध्ये अनेक त्रुटी सापडल्या. त्या दूर केल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होऊ लागला. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हिटी रेट ६.८५ टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल होऊ लागले आहे; पण दुसऱ्या लाटेचा कहर कमी झाल्यानंतर आता आगामी तिसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सक्रिय झाली आहे. या यंत्रणेला विविध सामाजिक संस्थांचीही मदत मिळत आहे.

proposed container hospital
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलांकडून बलात्कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी इंडो अमेरिकन फाउंडेशनला साताऱ्यात कोरोना रुग्णालय उभे करण्याची सूचना केली होती. त्यानुसार साताऱ्यात हे कोरोना रुग्णालय साकारले जाणार आहे. त्यासाठी जागेचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये कंटेनरचा वापर केला जाणार आहे. यामध्ये १६ आयसीयू बेड व ८४ ऑक्सिजन बेड असणार आहेत.

proposed container hospital
म्हारवंडला भूस्खलनाचा धोका; 'माळीण'सारख्या दुर्घटनेची शक्यता?

याचा सर्व खर्च इंडो अमेरिकन फाउंडेशन करणार असून, जिल्हा प्रशासन वीज, पाणी पुरविणार आहे. एका कंटेनरमध्ये आठ व्हेंटिलेटर बेड असणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत, तसेच हे कंटेनर फोल्डेबल असणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास या रुग्णालयाचा उपयोग जम्बो हॉस्पिलटप्रमाणे होणार आहे.

Hospital
Hospital

चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी खासदार शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच त्यांनी असे फोल्डेबल रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना यातून चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.