Karad News : आगामी रणनिती आखण्यासाठी ८४ वर्षाचा योध्दा मैदानात; कऱ्हाडला विधानसभा उमेदवारांची बैठक घेवुन जाणुन घेतली पराभवाची कारणे

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता. मात्र या बालेकिल्याला खिंडार पाडुन महायुतीने त्याचा ताबा घेतल्याचे विधानसभा निवडणुकीतुन स्पष्ट झाले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

कऱ्हाड - सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता. मात्र या बालेकिल्याला खिंडार पाडुन महायुतीने त्याचा ताबा घेतल्याचे विधानसभा निवडणुकीतुन स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथे येवुन सातारा जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार, महत्वाचे पदाधिकारी यांची बैठक आज सायंकाळी घेतली. पुढील वाटचालीची रणनिती आखण्यासाठी त्यांच्याकडुन पराभवाची कारणे श्री. पवार यांनी जाणुन घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.