जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी पाहायला मिळाली.
महाबळेश्वर (सातारा) : जिल्हा बॅंक निवडणुकीच्या (Satara District Bank Election) पार्श्वभूमीवर काल साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक झाली. ही घटना खूपच दुर्दैवी आहे. काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे कृत्य केलं. परंतु, ज्यांच्यासाठी हे कृत्य केलं, त्यांनी स्वतः या प्रकारासाठी दिलगिरी व्यक्त केलीय, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं. ते महाबळेश्वरात (Mahabaleshwar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या वक्तव्याला उत्तर देताना पवार म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक कोणतंही पॅनल किंवा महाआघाडीमार्फत लढण्याचं ठरलं नव्हतं, त्यामुळं अपयश आलेलं मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे. तसेच सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा (Shashikant Shinde) पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल, याच्या खोलात गेलेलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 1 मतानं पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली, या घटनेनंतर शरद पवार यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.
शंभूराज देसाई यांनी काय म्हंटलं होतं?
जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) राज्यस्तरीय नेत्यांकडून मला आपण एकत्रित निवडणूक लढवायची आहे, असे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही राज्यस्तरीय नेत्याचा, जिल्ह्यातील नेत्यांचा कोणाचाच संपर्क झाला नाही. शिवसेनेला (ShivSena) एकाकी पाडायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असेल, तर आम्ही पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगून लोकशाही मार्गानं शिवसेनेच्या वतीनं आम्ही यापुढे स्वतंत्र निवडणुका लढवू, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.