Sharad Pawar : महायुतीला रोखण्यासाठी शरद पवारांची जोरदार 'फिल्डिंग'; 'या' सात मतदारसंघांत उमेदवार देण्याची तयारी

पराभवातून बोध घेऊन आता आगामी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता आतापासूनच पक्षाने तयारी सुरू केली आहे.
Satara Lok Sabha Constituency Sharad Pawar
Satara Lok Sabha Constituency Sharad Pawaresakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्षाची बांधणी करणार आहोत.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha Constituency) पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्ह्यात पक्ष, संघटना बांधणीस सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय चाचपणी करून आठपैकी सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासाठी येत्या जुलैमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामध्ये खुद्द खासदार शरद पवार व जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख नेते रणनीती ठरविणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या विद्यमान आमदारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेला आव्हान पेलावे लागणार आहे.

Satara Lok Sabha Constituency Sharad Pawar
'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा फार मोठा उद्रेक होईल'; कोणी दिलाय इशारा?

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन शकले असूनही लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी बहुतांशी विधानसभा मतदरसंघांत चांगली मते घेतली आहेत. यामागे राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात आजही असल्याचे स्पष्ट होते; पण काही ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे; पण या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचीही साथ मिळाली आहे; पण त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. या पराभवातून बोध घेऊन आता आगामी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता आतापासूनच पक्षाने तयारी सुरू केली आहे.

याबाबत नगर येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात विधानसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते चार्ज झाले असून, आता जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटन बांधणी होणार आहे. यातून सर्व सेलची ताकद एकवटण्याचा प्रयत्न होणार आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यामध्ये कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत. हा मतदारसंघ वगळून इतर सातही मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेला उमेदवार देणार आहे. त्यासाठी रणनीती ठरविण्यासाठी जुलैमध्ये बैठक होणार आहे.

Satara Lok Sabha Constituency Sharad Pawar
Vishalgad : विशाळगडावर बकरी ईदला कुर्बानीसाठी High Court कडून परवानगी; या प्रथेवर सरकारने घातली होती बंदी

या बैठकीत उमेदवारांची चाचपणी, सध्याची त्या त्या मतदारसंघातील परिस्थिती आदी विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक महायुतीच्या विद्यमान आमदारांना सोपी जाणार नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, दीपक चव्हाण या सहा आमदारांना या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी झुंजवणार आहे. त्यासाठी या सहा मतदारसंघांत विशेष लक्ष दिले जाणार आहे.

कऱ्हाड उत्तरमध्ये शरद पवारांचा एकमेव आमदार आहे. त्यामुळे येथे भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील यांना ताकद देण्याचे काम होणार आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाची भरपाई विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष करणार आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Satara Lok Sabha Constituency Sharad Pawar
Shaktipeeth Highway : कोणत्याही परिस्थितीत 'शक्तिपीठ' महामार्ग रद्द करणारच; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

देसाई, पाटील यांची अडचण होणार...

वाई व पाटण मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली आहेत. येथून शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील प्रतिनिधित्व करतात. या दोघांच्या विरोधात शरद पवार पक्षाने उमेदवार दिल्यास देसाई व पाटलांची चांगलीच अडचण होणार आहे. शंभूराज देसाईंना झगडावे लागेल, तर मकरंद पाटील अजित पवारांसोबत राहणार की धोका टाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, यावर सर्व काही ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्षाची बांधणी करणार आहोत. पक्षश्रेष्ठी खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्याला पुन्हा पक्षाचा बालेकिल्ला बनवू

-सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.