Shardiya Navratri : महाराष्ट्राची कुलस्वामिनी काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मांढरदेव गडावर भाविकांची मोठी गर्दी

राज्यात शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) उत्सवास सुरुवात झाली आहे.
Mandharadev Dongar Kaleshwari Devi
Mandharadev Dongar Kaleshwari Deviesakal
Updated on
Summary

दरवर्षी मांढरगडावर नवरात्रोत्सव धार्मिक वातावरणात साजरा केला जातो.

वाई : राज्यात शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) उत्सवास सुरुवात झाली असून, संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या मांढरदेव (Mandhardevi Dongar) येथील श्री काळेश्वरी देवीच्या (Kaleshwari Devi) मंदिरात रविवारी घटस्थापना करण्यात आली. मंगळवार देवीचा वार असल्याने काळूबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

Mandharadev Dongar Kaleshwari Devi
Navratri Festival : काळा कोट, कायद्यावर बोट..! महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'या' नवदुर्गा ठोठावताहेत शिक्षा

दरवर्षी मांढरगडावर नवरात्रोत्सव धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या वेळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात एकत्र येऊन तेथे शास्त्रोक्त व विधिवत पद्धतीने घटस्थापना केली. त्यानंतर सर्व ग्रामस्थ, पुजारी, भाविक आणि देवस्थान ट्रस्टमार्फत डोंगर माथ्यावर असलेल्या काळूबाई मंदिरात शास्त्रोक्त व विधिवत पद्धतीने घटस्थापना केली. त्यानंतर देवींची महाआरती होऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला.

Mandharadev Dongar Kaleshwari Devi
Gopichand Padalkar : 'डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आधीच आरक्षण दिलंय, त्याच्या आडवं येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही'

दर वर्षीप्रमाणे यावर्षीही देवीच्या गाभाऱ्याला देवस्थान ट्रस्टमार्फत फुलांची सजावट केली असून, संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई देखील केलेली आहे. या देवीचे माहात्म्य मोठे असल्याने येथील नवरात्रोत्सव लक्षवेधक ठरतो. यावेळी विविध धार्मिक, तसेच भजन, कीर्तन, प्रवचन व देवीचा जागर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Mandharadev Dongar Kaleshwari Devi
Navratri Festival : कुछ किए बिना जयजयकार नहीं होती! 'या' कर्तबगार महिलांनी उद्योग-व्यवसायात निर्माण केली स्वतःची ओळख

ट्रस्‍टतर्फे प्रसाद, फराळाची सुविधा

नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होत असते. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे ६१ पोलिस कर्मचारी, ४० महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान, साफ- सफाई करण्यासाठी स्वकाम सेवा मंडळ, आळंदी यांची एक तुकडी कार्यरत आहे. त्यांची व्यवस्था देवस्थानमार्फत करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची, तसेच फराळाची सोय ट्रस्टमार्फत करण्यात आलेली आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रभारी सचिव दादा कळंबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.