NCP MLA : अक्कलशून्य लोढांनी इतिहासाबद्दल आपलं अज्ञान दाखवलंच; राष्ट्रवादीच्या आमदारानं काढली अक्कल

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंची शिवरायांशी तुलना केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
Mangal Prabhat Lodha Shashikant Shinde
Mangal Prabhat Lodha Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंची शिवरायांशी तुलना केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

सातारा : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवरायांशी तुलना केल्यानंतर आता मंत्री लोढा यांच्यावर शिवप्रेमींकडून टीकेची झोड उठली आहे. आमदार शशिकांत शिंदेंनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. अक्कलशून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवलेच. त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करणे गरजेचे आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

Mangal Prabhat Lodha Shashikant Shinde
Rickshaw Association : पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट; बाबा कांबळेंना संघटनेतून वगळलं!

प्रतापगड (Pratapgad) इथं शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या वेळी पर्यटनमंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली. त्यामुळं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर आमदार शिंदे (Shashikant Shinde) यांनी लोढा यांच्यावर तोफ डागली. शिंदे म्हणाले,‘‘शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे वक्तव्य लोढा यांनी केले. अक्कलशून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवले. त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करणे गरजेचे आहे.’’ आता तरी शिवप्रेमींनी उठा, जागे व्हा, एकीने विरोध करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Mangal Prabhat Lodha Shashikant Shinde
Gujarat Election : रवींद्र जडेजाची पत्नी उभी असतानाही वडिलांनी दिलं नाही भाजपला मत? मतदानानंतर केलं मोठं भाष्य!

लोढांना जिल्हाबंदी : राजेंद्र शेलार

मंत्री लोढा यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि स्वराज्यासाठी तळहातावर प्राण घेऊन लढलेल्या मावळ्यांचा घोर अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा यापुढे त्यांना जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही. त्यातूनही ते कोणाच्या आधाराने आलेच तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी दिला आहे. शिवप्रतापदिनी प्रतापगडावरील कार्यक्रमात बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान केला आहे. साताऱ्यातील जनता यापुढे स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.