कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड, मलकापूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नियम मोडणारे हॉटेल्स, बार, मॉल्स, मंगल कार्यालये यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती सात दिवसांसाठी सील करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या.
कऱ्हाड, मलकापूर व तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पहिल्यांदा आरोग्य विभागाने तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ""कऱ्हाड, मलकापूर शहरासह तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या बैठकीत दिल्या आहेत.
कोरोना चाचण्या वाढविणे, रुग्णांच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट शोधने, हॉस्पिटलची तयारी, बेड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरद्वारे रोजची माहिती ठेवणे याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. शिवाय काही हॉस्पिटल्स पुन्हा अधिगृहीत करण्यात येणार आहेत. यासाठी शारदा क्लिनिक, सह्याद्री, श्री हॉस्पिटल यासह काही हॉस्पिटल चालकांशी चर्चा केली आहे. आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करत आहोत.''
बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर
हॉटेल्स, मॉल, बारमध्ये गर्दी दिसत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याचे निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. निर्बंध डावलून जी दुकाने उघडी दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल्स, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास त्यांना 25 हजार ते एक लाखांपर्यंत दंड करणार आहोत. बार, रेस्टॉरंट वाईन शॉपमध्ये गर्दी दिसल्यास त्यांना दंडात्मक कारवाईबरोबर ती दुकाने सात दिवसांसाठी सील करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
यापुढील काळात राज्य शासन जे निर्णय घेईल, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोर केली जाईल.
शेखर सिंह, जिल्हाधिकारी
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.