सातारा : काेविड बांधितांची (covid 19 patient) संख्या दिवसेंदिवस सातारा (satara) जिल्ह्यात वाढत आहे. त्यापार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यात 15 मे पर्यंत लाॅकडाउन (lockdown) वाढविण्यात आलेले आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. त्यामध्ये देखील आराेग्य विषयक व्यवसाय सुरु आहेत. अन्य अत्यावश्यक सेवा घरपाेच दिल्या जात आहेत. दरम्यान तरी देखील काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. (shekhar singh order satara marathi news)
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकार राहील, असे कळविले असताना देखील बरेचसे नागरिक मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
वाढत्या रुग्ण संख्येत केंद्राच्या यादीत पुन्हा महाराष्ट्र
या आदेशानुसार दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी व शहरी भागात पोलीस विभाग, संबंधित नगर पालिका, नगरपंचायत, नगर परिषद विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.