लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना-२ अंतर्गत ना. अजयकुमार मिश्रा यांचे शिरवळ येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिरवळ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना-२ अंतर्गत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांचे शिरवळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर ना. मिश्रा यांनी नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराला भेट देऊन, महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत ना. मिश्रा यांचे आज दुपारी पुणे विमानतळावर आगमन झाले. याठिकाणी सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर शिरवळ येथे ना. मिश्रा हे डॉ. भोसले यांच्यासमवेत पोहचले असता तिथे माजी आमदार मदन भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.
यानंतर ना. मिश्रा यांनी नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराला भेट दिली आणि महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीलाही भेट दिली.
याठिकाणी झालेल्या समारंभात बोलताना ना. मिश्रा यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण व आरोग्यविषयक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, त्यांच्या महान कार्याला सलाम केला. ते पुढे म्हणाले, लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी भाजप कार्यरत आहे. सत्तेला आम्ही सेवेचे माध्यम मानतो. आज राज्यात व देशात भाजपचे सरकार आहे. भाजपा सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचविण्यात यश आल्याने, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल. तसेच महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार नक्की निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
याप्रसंगी डॉ. अतुल भोसले, मदन भोसले, सरपंच सौ. साधना नेवसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले, शेखर वढणे, अनिरुद्ध गाडवे, गणेश नेवसे, अविनाश वाडकर, कोमल नेवसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवार दि. १७ रोजी सकाळी ९ वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. १० वाजता चाफळ येथील श्रीराम मंदिराला ते भेट देतील. तसेच चाफळ येथे 'धन्यवाद मोदीजी' कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ११.३० वाजता उंब्रज येथे दुर्बल घटकांसोबत चर्चा, त्यानंतर कोरेगावमध्ये दुपारी १ वाजता लाभार्थी मेळावा, तसेच संघटनात्मक जिल्हा बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये जिल्हा पदाधिकारी, आघाडी मोर्चा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष व मंडल सरचिटणीस यांचा समावेश असणार आहे. याशिवाय सोशल मीडिया, आयटी सेल व लीगल सेलची बैठकही कोरेगाव येथे ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सातारा येथे ४ वाजता कोअर टीम व लोकसभा प्रवास समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यलय येथे जिल्हा प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर सायंकाळी ५.४० वाजता गणेश मंदिर , जवान्स सोसायटी, सदरबझार येथे बूथ बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सदरबझार येथील जनऔषधी केंद्रास सायंकाळी ६.२० मिनिटांनी ते भेट देणार आहेत. यानंतर विचार परिवार बैठक होऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. मिश्रा यांच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.