सायगाव : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी..., हर हर महादेव आशा घोषणाचा गजर करत जयहिंद फाउंडेशनच्या वतीने जम्मू येथे मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी केली.
या वेळी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने यांच्या नेतृत्वाखाली जम्मू, कोल्हापूर, सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, पुणे, बारामती, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, तसेच गोवा उत्तर प्रदेशमधील शाखेतील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
जम्मू येथील महाराजा हरिसिंग पार्क ते बलिदान स्तंभ दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या वेळी परिसर घोषणांनी दुमदुमला होता. या वेळी फाउंडेशनचे सचिव हनुमंत मांढरे, डॉ. केशव राजपुरे, जम्मू राज्याध्यक्ष तसरीम मन्हास, मनीषा अरबुणे, सातारा महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला कदम, दत्ता साळुंखे, रवींद्र कदम, सचिन कुंभार, वैभव कदम यांची उपस्थिती होती.
या वेळी श्री. माने म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ३५० वर्षे झाली, तरी अजूनही प्रत्येकाच्या रक्तात भिनला आहे. जम्मू - काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकला जातो.
त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. देशातील प्रत्येक राज्यात शिवजयंती साजरी झाली पाहिजे, या उद्देशाने जम्मूत प्रथमच फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी होत आहे.’’
मन्हास म्हणाले, ‘‘जम्मूतील हिंदू लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अजूनही स्मरणात आहे. त्यांचा इतिहास येथील युवकांना मार्गदर्शक आहे.’’ श्री. मांढरे यांनी मनोगत केले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने मिरवणूक, शिवजन्मोत्सवासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संस्कृती दळवी, हेमलता फडतरे, ऊर्मिला कदम, सुलभा लोखंडे यांनी प्रयत्न केले.
जम्मूत महाराष्ट्र गीत...
राष्ट्रगीताने सुरुवात करून जम्मू राज्यात प्रथमच महाराष्ट्र गीत जयहिंद फाउंडेशनच्या वतीने गायले गेले. जम्मूचे महान योद्धे जनरल झोरावर सिंग कहलुरिया यांच्या सहाव्या वंशज असणाऱ्या रिया आणि दीक्षा कहलूरिया यांचा सन्मान, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा सन्मान फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजींची प्रतिमा असणाऱ्या सन्मानचिन्हाने केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.