Satara : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचं कऱ्हाडात निधन

Shiv Sena leader Rambhau Rainak passes away
Shiv Sena leader Rambhau Rainak passes awayesakal
Updated on
Summary

तीन दशकाहून अधिक काळ जिल्ह्यात शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते ते नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

कऱ्हाड (सातारा) : माजी नगरसेवक व शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक (वय 62) यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं रात्री उशिरा निधन झालं. शिवसेनेचे (Shiv Sena) सातारा उपजिल्हाप्रमुख म्हणून रैनाक (Rambhau Rainak) कार्यरत होते. सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं. १९८८ साली रैनाक यांनी कऱ्हाडसारख्या संवेदनशील शहरात राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

रामभाऊ यांच्यावर शिवसेना कऱ्हाड (Karad) शहर प्रमुख पदाची जबाबदारी आली. त्यांनी ती कौशल्यानं पेलली. संघटन कौशल्य, उपक्रमशीलता व मनमिळावू स्वभावाच्या श्री. रैनाक यांनी शहर, तालुका व जिल्ह्यात शिवसेनेचा प्रसार-प्रचार केला. तालुक्यांमध्ये शिवसेना रुजवण्यासह वाढविण्यामध्ये रैनाक यांचा मोलाचा वाटा होता. तीन दशकाहून अधिक काळ कऱ्हाडसह जिल्ह्यात शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते ते नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तीन वर्षांपासून त्यांच्यावर सातारा उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा होती. त्यासह एस.टी कामगार सेनेच्या कार्यात देखील त्यांनी नेतृत्वाचा ठसा उमटवलाय.

Shiv Sena leader Rambhau Rainak passes away
शरद पवार काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही'

तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या श्री. रैनाक यांच्या अकाली निधनानं हळहळ व्यक्त होत आहे. येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत (Vaikunthadham Cemetery) त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. काही दिवसांत तालुक्यातील शिवसैनिकांवर एकापाठोपाठ एक असे दुःखाचे प्रसंग सुरू आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पवार, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अशोक भावके, माजी शहर प्रमुख राजेंद्र जाधव, उपतालुका प्रमुख भीमराव कळंत्रे, कऱ्हाड उपशहरप्रमुख कुलदीप जाधव आदी पदाधिकाऱ्यांचे अकाली निधन झाले. त्या धक्क्यातून सावरणाऱ्या शिवसेनेवर श्री. रैनाक यांच्या अकाली निधनानं दुःखाचा डोंगर कोसळलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.