'कोनशिलेमुळे छत्रपती संभाजी महाराज चौकाचं विद्रुपीकरण'; आक्रमक होत ठाकरे गटानं कोनशिलेची केली तोडफोड

कोनशिलेमुळे चौकाचे विद्रुपीकरण होणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.
Sambhaji Maharaj ChowkShiv Sena Thackeray Group
Sambhaji Maharaj ChowkShiv Sena Thackeray Groupesakal
Updated on
Summary

छत्रपतींपेक्षा कोणी व्यक्ती व कोणतीही शासकीय योजना मोठी नाही. छत्रपती संभाजीराजेंचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

वडूज : येथील नव्याने मंजूर झालेल्या पाणी योजनेच्या (Water Scheme) कामाची लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज चौकात कोनशिला बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) आक्रमक भूमिका घेत कोनशिलेची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

वडूज शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेतून ४६ कोटी ६७ लाख रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या कामाचा बुधवारी (ता. १०) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. या मंजूर कामाची कोनशिला बसविण्याचे काम शुक्रवारी (ता. ५) रात्रीपासून कऱ्हाड रस्त्यानजीक छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात येत आहे.

Sambhaji Maharaj ChowkShiv Sena Thackeray Group
Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता कोनशिला उभारली जात आहे. कोनशिलेमुळे चौकाचे विद्रुपीकरण होणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख, माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे व कार्यकर्त्यांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोनशिलेची तोडफोड करत काम बंद पाडले.

त्यामुळे आंदोलक आणि नगरपालिका प्रशासनामध्ये बाचाबाची झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर शहाजीराजे गोडसे आणि कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhaji Maharaj ChowkShiv Sena Thackeray Group
Konkan Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार दळवी करणार भाजपमध्ये प्रवेश?

छत्रपतींपेक्षा कोणी मोठा नाही

छत्रपतींपेक्षा कोणी व्यक्ती व कोणतीही शासकीय योजना मोठी नाही. छत्रपती संभाजीराजेंचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. याप्रकरणी प्रसंगी कायदा हातात घेतला जाईल, असा इशारा शहाजीराजे गोडसे, विजयराव शिंदे यांनी दिला.

शहाजीराजे गोडसे आणि कार्यकर्त्यांनी कोनशिला तोडण्याचा प्रयत्न केला, तसेच कामगारांना दमदाटी करण्याबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही अर्वाच्य भाषा वापरली आहे.

-कपिल जगताप, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वडूज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.