ऑनलाइन परीक्षेस कोरोना संसर्गाचा प्रश्न येतोच कुठे? शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी संतप्त

Shivaji University Exam
Shivaji University Exam
Updated on

कऱ्हाड : शिवाजी विद्यापीठाने  (Shivaji University) 12 एप्रिलपर्यंत होणाऱ्या परीक्षा कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन पुढे ढकलल्या आहेत. सातत्याने परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासावर पाणी फिरल्याने ऑनलाइन परीक्षा घेताना कोरोनाचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल उपस्थित करून तातडीने ऑनलाइन परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

शिवाजी विद्यापीठीच्या परीक्षा विभागाच्या वतीने 22 मार्चपासून 324 परीक्षांना प्रारंभ झाला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एक लाख 20 हजार विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने परीक्षेला बसले होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्य शासनाच्या ब्रेक द चेन या कोरोना मार्गदर्शक सूचनानुसार 30 एप्रिलपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याअनुशंगाने विद्यापीठाने साेमवारी रात्री उशिरा परीक्षाबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये बी.ए., बी.कॉम., बी,एस्सी.चे व्दितीय वर्ष, एम. ए., एम. कॉम.चे व्दितीय वर्ष, क्‍लस्टर स्वरूपातील अभियांत्रिकी, विधी आदी परीक्षांसह महाविद्यालयस्तरावर आयोजित प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून पुढील प्राप्त निर्देशानंतर परीक्षांबाबतचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी कळवले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. विद्यापीठाला ऑनलाइनच परीक्षा घ्यायची होती. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 


शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधी विभागाच्या सुरू असलेल्या परीक्षा रात्रीतच रद्द केल्या. दोन वेळा परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी एवढ्या दिवस केलेल्या अभ्यासावर त्यामुळे पाणी फिरले आहे. विद्यापीठाला ऑनलाइनच परीक्षा घ्यायची होती तर कोरोना संसर्गाचा प्रश्न येतोच कुठे? 

डॉ. धनश्री व्हटकर, विद्यार्थिनी, विधी विभाग 

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()