शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय ?

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, नीलेश शहा, जयदी ठुसे, प्रवीण शहाणे, ऍड. शुभांगी काटवटे, हेमांगी जोशी, दीपा झाड, नेहा लाटकर, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. विरेंद्र घडय़ाळे, डॉ. अभिराम पेंढारकर, डॉ. संजयकुमार कोरे, डॉ. स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.
Udayanraje-shivendra.jpg
Udayanraje-shivendra.jpgSystem
Updated on

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, नीलेश शहा, जयदी ठुसे, प्रवीण शहाणे, ऍड. शुभांगी काटवटे, हेमांगी जोशी, दीपा झाड, नेहा लाटकर, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. विरेंद्र घडय़ाळे, डॉ. अभिराम पेंढारकर, डॉ. संजयकुमार कोरे, डॉ. स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.

सातारा : शहरातील व्यापारी अडचणीत आले म्हणून त्यांना सहकार्य व्हावे यासाठी करमाफीचा निर्णय घेण्यात आला हे चांगले झालं आहे. पण तुम्ही एकीकडे 75 लाख रुपये सोडता अन्सा तारा शहरातील काेविड रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर (isolation center) उभारु शकत नाही, ही शोकांतिका आहे. खरं तर सध्या सातारकरांना (satara Citizens) याची खरी गरज आहे. ती मात्र तुम्हाला तुम्हाला पुरवता येत नाही. एक नगरसेवक करु शकतो, मग पालिका का कमी पडते असा प्रश्न नगरविकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले ( यांनी उपस्थित केला आहे. याबराेबरच रहिमतपूर पालिका करते तर मग आपली अ वर्ग पालिका असूनही का शक्य नाही, असा खाेचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांचे नाव न घेता केला आहे. (shivendraraje-bhosale-questions-udayanraje-bhosale-muncipal-council-covid19-isolation-center-satara-political-news)

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अयोध्या फाैडेंशनचे अध्यक्ष नगरसेवक विजय काटवटे यांनी उभारलेल्या मोफत कोविड सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नगरसेवक विजय काटवटे यांनी जनतेमधील नेमक्या समस्या जाणून मंगळवार पेठेतील पालिकेच्या ज्ञानविद्या मंदिर शाळेत आयसोलेशन सेंटर सुरु केले आहे. या आयसोलेशन सेंटरची नितांत गरज हाेती. ती काटवटे यांनी पुर्ण केली आहे. साता-यातील काेविड 19 ची रुग्ण संख्या आपण बघतोय. प्रत्येकाच्या घरात विलगीकरणाची सोय नाही. काही लोक वन रुम किचनमध्ये राहतात. त्यामध्ये एकाला संसर्ग झाला तर घरामध्ये इतरांना धोका निर्माण होवू शकतो.

रिक्षावाले असू द्या, मंडईमध्ये विक्री करणारे असू द्यात. ज्यांची घरे छोटी आहेत. घरांत रुग्ण वावरत असतात तर कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आयसोलेशन उपयुक्त ठरते. ज्यांचा कमी स्कोअर आहे. त्यांच्यावर याेग्य उपचार हाेतात. या रुग्णांना औषधे, योग्य वेळेला आहार मिळाला, थोडा व्यायाम केला तर फार काही न करता पेशंट कोरोनातून बरा होवू शकतो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशी आयसोलेशन सेंटर होणे गरजेचे आहे. त्याची आज सुरुवात विजय काटवटे यांनी केलेली आहे. त्यांचे प्रभागात काम आदर्शवत आहे.

Udayanraje-shivendra.jpg
Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे

या आयसोलेशन सेंटरमध्ये औषधांची सोय आहे. जेवणाची सोय त्यांनी केलेली आहे. टॉयलेट, बाथरुमची सोय शाळेमध्ये केलेली आहे. छोटे ऑक्सिजन मशिनही उपलब्ध केलेले आहे. या आयसोलेशन सेंटरचा फायदा नक्कीच कोरोना पेशंटना होईल. विजय काटवटे हे स्वतःच्या हिमतीवर आयसोलेशन सेंटर करु शकतात. असे प्रत्येक वॉर्डात पालिकेने स्वतः केले पाहिजे. त्याची गरज आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, नीलेश शहा, जयदी ठुसे, प्रवीण शहाणे, ऍड. शुभांगी काटवटे, हेमांगी जोशी, दीपा झाड, नेहा लाटकर, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. विरेंद्र घडय़ाळे, डॉ. अभिराम पेंढारकर, डॉ. संजयकुमार कोरे, डॉ. स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.

Udayanraje-shivendra.jpg
हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणा; राजेंचं उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना साकडं

साता-यात पालिकेच्या शाळा आहेत. कॉलेजच्या इमारती मोकळय़ा आहेत. मंगल कार्यालय मोकळे पडलेली आहेत. या ठिकाणी छोटी छोटी आयसोलेशन सेंटर पालिकेने उभी करणे गरजेचे आहे. एकीकडे 75 लाखांची घरपट्टी व्यापाऱयांची माफ केली. व्यापारी अडचणीत आले त्यांना मदत म्हणून निर्णय घेतला हे चांगले आहे. पण सध्या आयसोलेशन सेंटर हवीत त्याचा विचार पालिकेच्या सत्तारुढ पदाधिका-यांनी करावा असेही आमदार भाेसलेंनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.