सातारा : येथील गोडोली तळे सुशोभीकरण तसेच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून पर्यटकांसाठी सिटिंग पॉइंट उभारण्यासाठी पर्यटन खात्याकडून भरीव निधी द्या, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे सातारा दौऱ्यावर आले असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत गोडोली तळे सुशोभीकरण व अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या निधीसंदर्भाने चर्चा केली. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करून पर्यटक व नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह व इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. तळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमार्फत पर्यटन विभागाकडे सादर केला असून, हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी केली.
किल्ले अजिंक्यताराकडे जाणारा रस्ता अरुंद असून, पर्यटक आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाबरोबरच सुशोभीकरण करणे आवश्यक असून, यासाठी लागणारा निधी पर्यटन खात्याकडून उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली. दोन्ही मागण्यांबाबत श्री. ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, दोन्ही कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ठाकरे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.