हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणा; राजेंचं उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना साकडं

MLA Shivendrasinhraje Bhosale
MLA Shivendrasinhraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : सध्या कोरोना महामारीने (Coronavirus) सातारा जिल्ह्याला विळखा घातला असून हा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. महाराष्ट्रातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा सारख्या छोट्या जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ (Corona Patient) होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून साताऱ्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Ajit Pawar And Rajesh Tope) लक्ष घालावे. त्यांनी साताऱ्यात येऊन आढावा घ्यावा आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांनी केले आहे. (Shivendrasinhraje Bhosale Ajit Pawar Rajesh Tope Coronavirus Satara)

Summary

सध्या कोरोना महामारीने सातारा जिल्ह्याला विळखा घातला असून हा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे.

गेले महिनाभर सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. आता आजपासून पुन्हा जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन असतानाही गेल्या महिनाभरात रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही, मग आता या पाच दिवसांच्या लॉकडाउनमध्ये येईल, असे वाटत नाही. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये १४२३, पुणे जिल्ह्यात ९००, सोलापूरमध्ये १५३६, सांगलीमध्ये ११२६ तर कोल्हापूर जिल्ह्यात १७७४ च्या आसपास बाधित रुग्ण आढळून आले आणि सातारा जिल्ह्यात तब्ब्ल २६४८ रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत असून ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

लॉकडाउन सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चूक होत आहे, हे निश्चित. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे. त्यांनी तातडीने साताऱ्यात यावे आणि जिल्ह्यातील कोरोना महामारीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कोरोनाला आळा घालण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे आणि नियोजनबद्धरित्या जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी, अशी मागणीही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

MLA Shivendrasinhraje Bhosale
साता-यातील लाॅकडाउन जूनअखेर पर्यंत वाढणार?; रेड झाेनचा धस्का

महिनाभर लॉकडाउन असूनही परिस्थिती आटोक्यात आली नाही. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोक तसेच हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या गोर-गरीब लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. असंख्य लोकांची उपासमार सुरु आहे. लॉकडाउन असाच सुरु राहिल्यास लोकांना उदरनिर्वाह करणे आणि जगणे मुश्किल होणार आहे, याचीही ना. पवार, ना. टोपे आणि प्रशासनाने गंभीर दाखल घ्यावी. तसेच रॅपिड ऍक्शन टेस्टमध्ये वाढ करावी. ग्रामीण भागात सर्वत्र रॅट टेस्ट किट उपलब्ध करून द्यावी आणि बाधित आहेत पण कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांचा शोध घ्यावा, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडली जाईल. यासाठी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी साताऱ्यात यावे. परिस्थितीचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात आणि जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

Shivendrasinhraje Bhosale Ajit Pawar Rajesh Tope Coronavirus Satara

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()