शिवप्रतापदिन होणार साध्या पद्धतीने; प्रतापगडावर उद्या कार्यक्रमांना बंदी

कोरोनाच्या दोन लाटांचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर महाबळेश्वरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका पुन्हा डोकावत आहे.
Shivpratap Din Pratapgad
Shivpratap Din PratapgadSakal
Updated on

महाबळेश्वर - ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता किल्ले प्रतापगडावर दर वर्षी होणारा शिवप्रतापदिन सोहळा यंदा उद्या (ता. १०) मोजक्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी दिली. दरम्यान, शिवप्रतापदिनासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दोन लाटांचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर महाबळेश्वरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका पुन्हा डोकावत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या या नव्या; परंतु तितक्याच घातक व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार चौधरी पाटील यांनी शिवप्रतापदिनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली. दर वर्षी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते; परंतु यंदा अशा प्रकारे पुष्पवृष्टी केली जाणार नाही.

Shivpratap Din Pratapgad
दौलतनगरात गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बिबट्या

विविध प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजनाचे, साहसी खेळ, प्रदर्शने, त्याचप्रमाणे पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; परंतु यंदा अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यक्रमास हजर राहता येईल. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

किल्ले प्रतापगडावर कार्यक्रमाला गर्दी होऊ नये, यासाठी शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाची कोणत्याही माध्यमातून जाहिरात करता येणार नाही, तसेच फलकही लावता येणार नाही. यादिवशी गडावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गडावर कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची आयोजकांनी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही तहसीलदारांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. त्याचप्रमाणे या दिवशी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.