कोरेगाव (सातारा) : हिंदू कोड बिलाच्या (Hindu Code Bill) मुद्द्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी केंद्रीय कायदामंत्रीचा (Minister of Law) राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर विद्यमान परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राजकीय इच्छाशक्ती दाखवत सर्व खासदारांनी राजीनामा देऊन केंद्र सरकारवर दबाव निर्माण केल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल, असे मत शिवसेनेच्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख अमोल आवळे (Shivsena leader Amol Awale) यांनी व्यक्त केले आहे. (Shivsena leader Amol Awale Demand Resignation Of MP For Maratha Reservation Satara Marathi News)
मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर केंद्र सरकारकडून गंभीरपणे विचार झाला नाही. त्यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला (Muslim Community) आरक्षण मिळावे, मागासवर्गीयांची पदोन्नती तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC political reservation), या प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्यापासून (ता. २६) सातारा ते राजभवन (मुंबई) अशी सर्वपक्षीय पदयात्रा अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य भाऊसाहेब वाघ, काँग्रेसच्या (Congress) अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हमीदभाई पठाण, राष्ट्रवादीचे जयेंद्र लेंभे, भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) नितीन चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे किशोर सोनावणे, दयानंद पोळ, शिवसेनेचे दत्ता जाधव आदी प्रमुख सहभागी होणार आहेत. त्याविषयी माहिती देताना श्री. आवळे बोलत होते.
ते म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्रात लाखोंच्या उपस्थितीत ५८ मूक मोर्चे निघाले होते. त्यात अनेक तरुणांची आहुती पडली आहे. त्यांच्या बलिदानामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र, तरीही आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर केंद्र सरकारकडून (Central Government) गंभीरपणे विचार झाला नाही. त्यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास ते या घटकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रिम कोर्टाकडून रद्दबातल करण्यात आले आहे. हे आरक्षण देखील केंद्र सरकारकडून पूर्ववत होणे गरजेचे आहे. या सर्व प्रमुख प्रश्नांबाबत जनमाणसामध्ये तीव्र भावना आहेत. या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिले जाणार आहे." त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते उद्या (ता. २६) सातारा येथून पदयात्रेने राजभवन (मुंबई) येथे जाणार आहोत, असे श्री. आवळे यांनी सांगितले.
Shivsena leader Amol Awale Demand Resignation Of MP For Maratha Reservation Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.