सामान्यांची कामे हाेत नसल्याने तहसीलदारांवर शिवसैनिक नाराज

सामान्यांची कामे हाेत नसल्याने तहसीलदारांवर शिवसैनिक नाराज
Updated on

वडूज (जि. सातारा) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वसामान्य माणसाची कामे झाली पाहिजेत, यासाठी आदेश दिले आहेत, असे असताना खटाव तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य माणसाची अडवणूक होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
 
तालुक्‍यातील 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी महिला संघटक छाया शिंदे, पूनम माने, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील, माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, उपतालुका प्रमुख महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, शहरप्रमुख सुशांत पार्लेकर, किशोर गोडसे, विभागप्रमुख संतोष दुबळे, राणी काळे, अमित कुलकर्णी, आबासाहेब भोसले, विकास काळे, गायत्री तिवाटणे, हनुमंत देवकर, संपत देवकर आदी उपस्थित होते.

Wow It's So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद 

या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील कामाबाबत जाधव यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्याची शहनिशा केल्यानंतर जाधव यांनी माध्यमांशी बाेलताना तहसीलदार यांच्या कामाकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग सुरू होती. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख जाधव यांना भेटू शकलो नाही. त्यानंतर श्री. जाधव यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली, असे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.