Political News : 'नगरपंचायत निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार'

Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on
Summary

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार आहे.

बिजवडी (सातारा) : शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार दहिवडी येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Dahiwadi Nagar Panchayat Election) आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची माहिती माण-खटावचे शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

ते म्हणाले, ‘‘दहिवडी ग्रामपंचायतीवर आपल्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व स्थापित केले होते. दहिवडीत आपल्याला मानणारा मोठा गट असून, शिवसेनेच्या माध्यमातून या गटाच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत शिवसेना सर्व १७ जागांवर उमेदवारी अर्ज भरणार असून, या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून जबाबदारी घेणार आहे.’’

Uddhav Thackeray
पंचायत समितीच्या सभापतिपदी NCP च्या अश्विनी पवारांची बिनविरोध निवड

दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण असून, याठिकाणची नगरपंचायत ही आदर्शवत असणे गरजेचे आहे. आपल्याकडे काही दिवसच ग्रामपंचायत असताना आपण ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलला होता. मात्र, ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर आपल्या हातून सत्ता गेली. नगरपंचायतींना मोठा निधी येऊनही विरोधकांना दहिवडीचा विकास करता आला नाही. विरोधकांनी या नगरपंचायतीचा फक्त पदापुरता वापर करत सत्ता भोगल्याचीही टीका त्यांनी केली. दहिवडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण या वेळी शिवसेनेच्या माध्यमातून पॅनेल टाकत मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Uddhav Thackeray
'10 वर्षात काँग्रेसचा 90 टक्क्यांहून अधिक निवडणुकांत पराभव'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()