कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाबाधितांची संख्या कऱ्हाड, मलकापूरसह तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे शहरासह मलकापूरमधील रुग्णालयांचे बेड सध्या फुल्ल झाले आहेत. त्यातच व्हेंटिलेटरचे बेडही मिळत नसल्याच्या रुग्ण व नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. त्यासंदर्भात प्रशासनाने उपलब्ध बेडची माहिती डॅशबोर्डवर देण्याच्या सूचना रुग्णालयांना केल्या होत्या. मात्र, तो डॅशबोर्ड कागदावरच राहिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव टांगणीलाच लागल्यासारखी स्थिती झाली आहे. कोरोना या महामारीच्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे बाधितांना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची दररोजच गडबड सुरू आहे. त्यातच सर्वसामान्य लोक रुग्णाला घेऊन रुग्णालयामध्ये गेल्यावर तेथे बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयाचे नाव सांगून तिकडे रुग्णाला पाठवले जाते. दरम्यानच्या काळात त्या रुग्णाचे मोठे हाल होतात. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर संबंधित रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होते. त्यातच रुग्णाला गेल्या-गेल्या बेड मिळत नाही. त्याला या रुग्णालयामधून त्या रुग्णालयामध्ये फिरवावे लागते. त्यातच त्या रुग्णाचा श्वास कमी होऊन ते दगावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कऱ्हाड, मलकापूरमधील रुग्णालयांमधील बेड फुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. ते बेड खरंच फुल्ल आहेत का, याची तपासणी प्रशासनाने करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांच्या कुटुंबांतील रुग्णांची होणारी गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने बेडच्या उपलब्धतेची माहिती दररोज होण्यासाठी डॅशबोर्डवरच बेडच्या उपलब्धतेची प्रसिध्दी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचा भरणा
पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर कऱ्हाडला चांगली आरोग्यसेवा देण्यात येत आहे. त्यामुळे शेजारील सांगली, कोल्हापूर, पुण्याचा काही भाग आणि सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांचा कोरोना उपचारासाठी कऱ्हाडमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्या परजिल्ह्यातील रुग्णांमुळे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील रुग्णांना कऱ्हाडमध्ये बेडच मिळत नसल्याचे दिसत आहे.
ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ
Video पाहा : Remdesivir चा साठा वाढविण्यासाठी नियोजन सुरू; इंजेक्शनच्या वापराबाबत वैद्यकीय अधिका-यांनी ठरवावे
शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.