गळचेपी कराल, तर सरकारला सळो की पळो करून सोडू; पाटणकरांचा इशारा

Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackerayesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : श्रमिक मुक्ती दलाच्या (Shramik Mukti Dal) ४० वर्षाच्या इतिहासात कधीही जाहीर केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा आंदोलन, सत्याग्रह केला नाही, असे असताना आज पाटण तालुक्यात कोयनानगर येथे मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister Uddhav Thackeray) दौऱ्यावेळी येथील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करणे ही बाब अत्यंत वेदनादायक व शासनाची प्रतिमा मलिन करणारी आहे, शासन असाच व्यवहार करणार असेल, तर आम्हाला सरकारविषयी वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (Dr. Bharat Patankar) यांनी दिला. (Shramik Mukti Dal Leader Bharat Patankar Criticism Of Chief Minister Uddhav Thackeray bam92)

Summary

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हिटलरशाही पद्धतीने स्थानबद्धता झाली. ती योग्य नाही. त्याला आम्ही भीक घालत नाही.

अतिवृष्टी झाल्यामुळे पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून नुकसान झाले आहे. ढोकावळे, मिरगाव या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या (Koyna Project) गावात जीवित हानी झाली आहे. तर बाजे येथील अडकलेल्या लोकांना बोटीने बाहेर काढण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय होते. कालपर्यंत श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भर पावसात मदत कार्यात प्रशासन आणि NDRF टीम, यांच्या बरोबर आघाडीवर होते. प्रशासन पोहचू शकत नव्हते, तेव्हा ही श्रमिक मुक्ती दलाची टीम पोहोचली होती. 

Chief Minister Uddhav Thackeray
माझं मुंडक तेवढंच बाहेर होतं

या सर्व परिस्थितीत तातडीने मदतकार्य पोहचणे आणि कमीतकमी नुकसान होण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते. असे असताना आज मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी  मदतकार्यात पुढाकारात असलेल्या कार्यकर्त्यांना कोयनानगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवणे आणि मोबाईल काढून घेणे हे राजकीय षडयंत्र असून सत्य परिस्थिती ही मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचू नये, यासाठी रचलेली ही बाब अत्यंत खेदजनक व निंदनीय आहे. याचा जाब सरकारमधील वरिष्ठांना विचारला जाईल, असा इशाराही डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
खराब हवामानामुळं दौरा रद्द; उद्धव ठाकरे म्हणतात.. मी पुन्हा येईन!

यामुळे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते खचून जाणार नसून आज नव्याने पळासरी येथे होत असलेल्या दरड कोसळण्याची घटना घडली आहे, त्या ठिकाणी मदतीसाठी त्याच जिद्दीने व नव्या जोमाने जात आहेत, परंतु कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता असे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ना उमेद करण्याच्या या षडयंत्राला श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते भीक घालणार नाहीत.

Chief Minister Uddhav Thackeray
तुटलेल्या पुलाला शिड्या लावून नागरिकांचं स्थलांतर!

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हिटलरशाही पद्धतीने स्थानबद्धता झाली. ती योग्य नाही. त्याला आम्ही भीक घालत नाही. जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो, यापुढे अशीच गळचेपी केली, तर अधिकाऱ्यांना आणि या सरकारला सळो की पळो करून सोडू.

-डॉ. भारत पाटणकर, नेते, श्रमिक मुक्ती दल

Shramik Mukti Dal Leader Bharat Patankar Criticism Of Chief Minister Uddhav Thackeray bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.