Ramraje Nimbalkar : आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचा पायच निघेल; रामराजेंचा कोणाला इशारा?

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांनी चिंता करू नये.
Shri Ram Cooperative Sugar Factory Annual Meeting Ramraje Naik Nimbalkar
Shri Ram Cooperative Sugar Factory Annual Meeting Ramraje Naik Nimbalkaresakal
Updated on
Summary

आपण कितीही धरणे बांधली; पण जर पाऊसच पडला नाही, तर धरणात पाणी येणार कुठून?

फलटण शहर : श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांनी चिंता करू नये. हा कारखाना आता अवसायानातून सुस्थितीत आला आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच श्रीरामही ऊस दर देऊन शेतकरी समृद्ध करण्याचे काम करेल. विरोधकांना मात्र हे बघवत नसल्याने त्यांनी याही कारखान्यात राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आमच्या पायात पाय घालण्याचा जो प्रयत्न करेल. त्याचा पाय निघेल, असा इशारा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Ram Sugar Factory) ६८ व्या वार्षिक सभेचे आयोजन कारखानास्थळावर करण्यात आले होते. त्या वेळी रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह संचालकांची उपस्थिती होती.

Shri Ram Cooperative Sugar Factory Annual Meeting Ramraje Naik Nimbalkar
वाघनखांवरुन राजकारण तापलं! 'आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील'; मंडलिक, मुश्रीफांचा निशाणा

आपण कितीही धरणे बांधली; पण जर पाऊसच पडला नाही, तर धरणात पाणी येणार कुठून? असा सवाल करून रामराजे म्हणाले, ‘‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त धरणातील पाणी आपल्याला कसे मिळेल, याचा विचार न करता आज अनियमित पाऊस का पडत आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. उसाचा गाळप हंगाम तीन महिनेच चालतो. कारण उसाचे उत्पादनच निघत नाही. त्यामुळे कारखान्याचा दर आणि रिकव्हरी याचा विचार करून चालणार नाही.

Shri Ram Cooperative Sugar Factory Annual Meeting Ramraje Naik Nimbalkar
Jayant Patil : भाजप खासदाराच्या आरोपानंतर NCP प्रदेशाध्यक्षांनी केली आमदार सुमन पाटलांची पाठराखण; काय आहे कारण?

जागतिक तापमानवाढीमुळे पावसाची अनियमितता आहे. त्यामुळे अशा हवामानामध्ये आपल्याला कमी पाण्यावर येणारा उसाचा वाण तयार केले पाहिजेत, तरच यापुढील काळात आपल्याला उसाचे उत्पादन घेता येईल. ऊस पिकला तरच कारखाना टिकेल व कारखाना टिकला तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकेल.’’

Shri Ram Cooperative Sugar Factory Annual Meeting Ramraje Naik Nimbalkar
नदीकाठच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य; पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून मांत्रिकासह 15 जणांनी केला विधी, करणीचा प्रकार उघड

श्रीराम आज सुस्थितीत असल्याचे विरोधकांना बघवत नाही. अगोदर त्यांनी स्वत:च्या कारखान्यावर किती कर्ज आहे, देणी किती आहेत, रिकव्हरी किती आहे, गाळप क्षमता किती आहे, हे पाहावे. जे श्रीरामला ऊस घालत नाहीत. ते आता या कारखान्यावर बोलत आहेत. श्रीराम कारखान्याने केलेले करार पारदर्शक आहेत. हे करार झाले नसते, तर आज हा श्रीराम चालू स्थितीत दिसला नसता. शेतकऱ्यांनीही आम्ही केलेल्या कामाचे चीज करावे, असे आवाहन रामराजे यांनी सभासदांना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.