Shriram Pawar : लोकशाहीच्‍या वाटचालीपुढे बहुसंख्याकवादाचे आव्‍हान

श्रीराम पवार : लोकशाहीचा अवकाश आक्रसतोय
Shriram Pawar
Shriram Pawar
Updated on

सातारा : प्रतीके आणि भाषेवरून भेद निर्माण करायचे काम अलीकडच्‍या काळात सुरू आहे. इतिहासाची मांडणी देखील दोन जातींभोवतीच होत असून, त्‍यातून बहुसंख्‍याकवाद वाढीस लागला आहे. आपल्‍या देशात अनेक मतप्रवाह आणि त्‍यांनी प्रेरित झालेल्‍या चळवळी आहेत. या चळवळींवर कोणता ना कोणता शिक्का मारत त्‍यांना बदनाम करण्‍याचे काम सुरू आहे. एकूणच लोकशाहीचा अवकाश आक्रसत आहे, असे मत ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी आज येथे व्‍यक्‍त केले.

येथील संबोधी प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित थोरांच्‍या स्‍मृती या व्‍याख्यानमालेचे हे ३५ वे वर्ष असून, यात श्रीराम पवार हे ‘भारतीय लोकशाहीची वाटचाल’ या विषयावर बोलत होते. पवार म्‍हणाले, गेल्‍या ७५ वर्षांत आपण पायाभूत सुविधांचा मोठा पल्‍ला गाठला असून, या काळात आपण प्रगल्‍भ झालो का, याचा धांडोळा घेतला पाहिजे. अलीकडे घटनेला पोखरायचे काम सुरू आहे. यातून लोकशाहीचे चारही स्‍तंभदेखील वाचलेले नसल्‍याचे दिसून येत आहे. धर्मनिरपेक्षता हे लोकशाहीचे तत्त्व आहे. हे तत्त्व मान्‍य करणारेच आज बहुसंख्‍याकवादाचा पुरस्‍कार करत असून, त्‍यांची नजर मतांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.