राष्ट्रवादीला धूळ चारणा-या विलासकाकांचे सोनिया गांधींनी केले हाेते काैतुक

राष्ट्रवादीला धूळ चारणा-या विलासकाकांचे सोनिया गांधींनी केले हाेते काैतुक
Updated on

कराड : सन 1999 मध्ये राष्ट्वादी कॉंग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांना साथ दिली. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते राष्ट्वादीत दाखल झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांची माेठी अडचण निर्माण झाली हाेती. या काळातही आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी कॉंग्रेसशी फारकत न घेता पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले. त्याचे फळही त्यांना पक्षाकडून मिळाले.

विधानसभेच्या 1999 च्या निवडणुकीत सातारा जिल्हयात राष्ट्रवादीकडून संपूर्ण कॉंग्रेस भुईसपाट झाली. जिल्ह्यातील दोन लोकसभा व दहा विधानसभा मतदारसंघापैकी फक्त कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात कॉंग्रेसची विजयी पताका विलासकाकांनी कायम ठेवली. या निवडणुकीत काकांनी विलासराव वाठारकर यांचा पराभव केला हाेता. या निवडणुकीत काकांना 62 हजार 795 मते मिळाली हाेती. तसेच वाठारकरांना 39 हजार 161 इतकी मते पडली हाेती. त्यावेळी कॉंग्रेसने काकांना दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपद बहाल केले.

सलग सात वेळा आमदार राहिलेल्या विलासकाकांचा असा झाला राजकीय प्रवास 

काकांच्या आठवणींनी राजविलासही गहिवरला; उंडाळेत अंत्यसंस्कार 

सातारा जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादीमय वातावरण असताना कॉंग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधींची जाहीर सभा घेण्याचे आव्हान विलासकाकांनी स्विकारले. त्या दुष्काळी तालुक्यांच्या दाै-यावर येणार हाेत्या. पक्षातील कार्यकर्त्यांसाठी ते एक प्रकारचे बळ हाेते असे सांगितले जाते. 19 ऑक्‍टोबर 2003 रोजी कऱ्हाडच्या शिवाजी स्टेडीयमयवर श्रीमती सोनिया गांधी यांची जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणाची सुरुवातच श्रीमती गांधींनी विलासकाका यांचे नाव घेऊन केले. त्यांनी सभेच्या संयोजनाबद्धल विलासकाकांचे खूप कौतुकही केले.

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनचा विलासकाकांचा उपक्रम तरुणांना प्रेरणादायी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

संपादन - सिद्धार्थ लाटकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.